कन्हान : – दि श्रीराम सहकारी साखर कारखाना मर्यादित बापदेव ता. मौदा जि नागपुर (सध्याचे नाव व्यंकटेश्वरा पॉवर प्रोजेक्ट युनिट क्र २ बापदेव ) येथील कर्मचारी /कामगारांचे थकीत वेतन देण्यास कारखाना प्रशासनाने टाळाटाळ न करता १३ मे च्या सभेत योग्य निर्णय न घेतल्यास उपविभागीय कार्यालय मौदा येथे उपोषण करून त्वरीत थकीत देण्याची मागणी करण्यात येईल.
दि श्रीराम सहकारी साखर कारखाना मर्यादित बापदेव ता. मौदा जि नागपुर ( सध्याचे नाव व्यंकटेश्वरा पॉवर प्रोजेक्ट युनिट क्र २ बापदेव ) येथील कर्मचारी /कामगारांचे थकीत वेतन मिळणेबाबत मा. मंत्री सहकार व वस्त्रोद्योग यांच्या दालनात मंत्रालय मुंबई येथे दि ११/१२/ २०१८ रोजी झालेल्या सभेतील निर्णया नुसार मा. उपविभागीय अधिकारी मौदा येथील दि. १८/०२/२०१९ व दि ३०/ ०४/२०१९ ला स़भा घेण्यात आल्या.
मंगळवार दि. ३० एप्रिल ला सकाळी ११ वाजता उपविभागीय कार्यालय, मौदा येथे सभा घेण्यात आली. परंतु सदर सभेत कारखान्याचे प्रतिनिधी उपस्थित झालेले नव्हते व त्या बाबत त्यांनी उपविभागीय कार्यालय मौदा यांना काहीही कळविले नाही. यामुळे व्यवस्था पन शासकीय कामास टाळाटाळ करित असुन शासकीय कामाचे व कर्मचा-यांची दिशाभूल करुन वेतन देण्याच्या कामास विलंब करीत आहे .
मा. उपविभागीय अधिकारी मौदा यांनी पुढील सभा दि १३/०५/२०१९ ला घेण्याचे ठरविले आहे. सदर सभेत कारखाना प्रशासनाने कामगारांच्या थकीत वेतना बाबत योग्य निर्णय न घेतल्यास दि १३ मे २०१९ नंतर उपविभागीय कार्यालय मौदा येथे उपोषण करण्यात येईल. तेव्हा उदभव णा-या प्रसंगास कारखाना व्यवस्थापन सर्वस्वी जवाबदार राहील. असा इशारा कर्मचारी प्रतिनिधी चंद्रशेखर लौटावार, रमेश कारेमोरे, महेंद्र भुरे, प्रेमविलास सातपुते, मोहन धांडे , जयराम गोरले, विजय वाडीभस्मे , मिलिंद टोपरे, आंनदराव ढोमणे व माजी कर्मचारी वामनराव देशमुख, पंढरी सरोदे , रामेश्वर टोपले, शाम जिवतोडे, गोविंदा हटवार, मनोहर ठवकर, अजाब भगत, कवडु मुरकुटे, जगदीश येळणे, रविंद्र किनेकर, विवेक गजभिये, सुरेश मानकर सह कर्मचारी हयानी देऊन त्वरित थकीत वेतन देण्याची मागणी केली आहे.