कामठी: नागपूर टुडे 28 मे च्या अंकात ‘मान्सूनपूर्व नाले सफाई कामे अजुनही अधांतरी ‘या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले होते या वृत्राची गंभीर दखल घेत कामठी नगर परिषद प्रशासनाने आजपासून नाला सफाई कामाला गती दिली असून प्रभाग क्र 15 मधून या कामाची सुरुवात करण्यात आली.
दरवर्षी कामठी नगर परोषद च्या वतीने मान्सूनपूर्व नाला सफाई कामे युद्धस्तरावर राबविल्याचा गाजावाजा करीत लाखो रुपयांची उधळण केली जाते मात्र यावर्षी पावसाळा लागल्याच्या तोंडावर असूनही शहरातील बागडोर नाल्यासह इतर वस्तीतील नाल्यांची खोलीकरणं करून कुठलीही सफाई करण्यात न आल्याने नाल्यात जमलेल्या गाळ तसेच सांडपाण्यामुळे नाल्यात डुकरांच्या संचार असून नाल्याकाठी राहणाऱ्या नागरिकांसह इतरांना बिनधास्त पणे रोगराईचे निमंत्रण देत आहे तर येथील नगर परिषद विभाग या बाबीकडे अक्षम्य दुर्लक्ष पुरवीत असल्याने मान्सूनपूर्व नाले सफाई कामे हे अजूनही अधांतरी असल्याने पावसाळा तोंडावर तरीही नाले अस्वच्छ असल्याने स्थानिक नगर परोषद प्रशासनाने नाले सफाई कार्याला लवकरात लवकर गती देण्यात यावी अशी मागणी कामठी नगर परोषद चे माजी उपाध्यक्ष अजय कदम यांनी केली होती या वृत्राची दखल घेत नगर परिषद मुख्याधिकारी रविकांत डाके यांच्या आदेशानुसार स्वास्थ्य निरीक्षक विजय मेथीयां यांनी प्रभाग क्र 15 येथील छावणी गौतम नगर येथील बागडोर नाल्याची सफाई करण्यास सुरुवात करण्यात आली असून नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विषयाला अनुसरून शहरातील संपूर्ण नाल्याची सफाई टप्प्या टप्प्याने करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.