Published On : Fri, Jun 7th, 2019

उपविभागोय अधिकारी ने घेतला मान्सूनपूर्व तयारी आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा

Advertisement

कामठी – आगामी पावसाळ्यात संभाव्य पुराचा धोका टाळण्यासाठी करावयाची पूर्वतयारी व आपत्कालीन परिस्थितीत करावयाची कारवाही यासंदर्भात मान्सूनपूर्व तयारीची कामठी-मौदा उपविभागीय अधिकारि वंदना सवरंगपते यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तहसिलदार अरविंद हिंगे व सहाययक गट विकास अधिकारी सचीन सूर्यवंशी, सहाययक गट विकास अधिकारी सुरेश कोल्हे यांच्या मुख्य उपस्थिती कामठी पंचायत समिती सभागृहात मान्सूनपूर्व तयारी आपत्ती व्यवस्थापणा बैठक पार पडली.

या बैठकीला कामठी पंचायत समिती सभापती अनिता रमेश चिकटे, उपसभापती देवेंद्र उर्फ बाळू गवते, जिल्हा परिषद सदस्य नाना कंभाले, जी प सदस्य विनोद पाटील, पंचायत समिती सदस्य मदन राजूरकर, विस्तार अधिकारी शशिकांत डाखोळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.या बैठकित मागील वर्षी झालेल्या मुसळधार पाऊस तसेच पुरपरिस्थितीचा आढावा घेण्यात आला तसेच पूरप्रवण गावाच्या नोंदीसह पूरपरिस्थिती निर्माण होणाऱ्या गावाची माहिती घेण्यात आली.त्यासाठी तालुका प्रशासनाने विविध बाबीवर केलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला .

Today’s Rate
Saturday 05 Oct. 2024
Gold 24 KT 76,100/-
Gold 22 KT 70,800/-
Silver / Kg 93,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ज्यामध्ये तालुकास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापणा करणे, रस्ते व पुलाच्या निरीक्षण करून त्याची दुरुस्ती करणे, तहसील कार्यालयाने पावसाची ऑनलाईन माहिती प्रत्येक दिवशि अपडेट करणे, नदीच्या पुराचे निरीक्षण करणे, पूरपरिस्थिती मध्ये शोध बचाव यासाठी लागणारे सर्व साहित्याची वेळीच सोय करणे आदींवर चर्चा करण्यात आली.यावेळी उपविभागोय अधिकाऱ्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या यामध्ये तालुक्यात पडलेल्या क्षेत्र निहाय पर्जन्याचे माहिती प्रत्येक दिवशी आनलाईन द्वारे अपडेट करावी , नियंत्रण कक्षात जवाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती करून त्यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करावा .

Advertisement

शोध व बचावासाठी लागणाऱ्या साहित्याची कुठे कमतरता असेल त्याची पर्यायी व्यवस्था पूर्वीच करून घ्यावी .तसेच आपत्ती निवारण कार्यात स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच पदाधिकाऱ्यांना सहभागी करून घ्यावे सोबतच आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शासकीय रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राची तपासणी करून पुढील तीन महिने पुरेल इतकी औषधे रुग्णालयात साठवून ठेवावेत .पुरबाधित तसेच जोखीम असलेल्या गावांची यादी तयार करून त्यांच्याशी उत्तम संपर्क व्यवस्था निर्माण करावी .पुरपरिस्थितीत गरोदर मातांच्या प्रसूती प्रक्रियेत अडथळा येणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना यावेळी त्यांनी सर्व यंत्रणांना दिल्या.

तसेच पाणी टंचाई 2019, सर्वांसाठी घरे 2022(अतिक्रमण नियमानुकूल करणे, पट्टेवाटप),पालकमंत्री पांदण रस्ते योजना, धडक सिंचन विहीर, आदींचा आढावा घेतला व आपत्ती व्यवस्थापन आराखडा, आपत्कालीन जवाबदाऱ्या, पूर व्यवस्थेपणासाठी आदर्श कार्यप्रणाली, आर्थिक व्यवस्थामध्ये असलेले पंतप्रधान मदत निधी, मुख्यमंत्री मदत निधी, राज्य आपत्ती व्यवस्थापन निधो, जिल्हा नियोजन निधींआदी बाबत मार्गदर्शन केले.

यावेळी ग्रामपंचायत सरपंच, सचिव तसेच तलाठी, मंडळ अधिकारी व संबंधित अधिकारी वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते.