Advertisement
नागपूर : कृषी विभागाच्या भरारी पथकाने नागपूर जिल्ह्यातील दोन ठिकाणी धाडी टाकून ३६ हजार रुपये किमतीचे बोगस बियाणे जप्त केले. या दोन्ही कारवाया जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रवीण देशमुख यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
यात प्रवीण नागरगोजे कृषी अधिकारी पं.स. उमरेड व रवींद्र राठोड, कृषी अधिकारी पं.स. भिवापूर यांचा समावेश होता.
उमरेड तालुक्यातील बेला व नागपूर तालुक्यातील दहेली आष्टा येथे या कारवाया करण्यात आल्या. या दोन्ही ठिकाणी अनधिकृत, विना परवाना असलेले कापसाचे बियाणे विक्री करण्यात येत होते. आतापर्यंत कृषी विभागाच्या भरारी पथकाने बोगस बियाण्यांच्या सात कारवाया केल्या आहेत.