काटोल: मला या भागातील शेतकऱ्यांचे समस्यांची जाण असून काटोल नरखेड येथील संत्रा बहुवार्षिक पीक वगळल्याने त्यासंबंधी प्रस्ताव घेऊन निर्णय घेणार असल्याचे आश्वासन राज्याचे नवं कृषिमंत्री डॉ अनिल बॉंडे यांनी न प सत्कार समारंभ कार्यक्रमात दिले. स्थानिक नगर परिषदेने कार्यालय प्रांगणात रविवार दिं 23 जूनला नगरीत प्रथम आगमन प्रित्यर्थ सपत्नीक सत्कार समारंभ सत्तापक्ष गट नेते चरणसिंग ठाकूर यांचे मार्गदर्शनात कृषिमंत्री यांचा सपत्नीक सत्कार आयोजित केला होता.
याप्रसंगी अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष वैशाली दिलीप ठाकूर, भाजपा जिल्हाध्यक्ष राजीव पोतदार, जि प अर्थ व शिक्षण सभापती उकेश चव्हाण, प स सभापती संदीप सरोदे, मोवाड नगराध्यक्ष सुरेश खसारे,न प मुख्याधिकारी अशोक गराडे, सभापती देविदास कठाने, किशोर गाढवे, हेमराज रेवतकर, तानाजी थोटे, सुभाष कोठे,आजू चरडे,अँड दीपक केने, दिनेश ठाकरे, कैलास खंते, वैभव विरखरे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे कृषी मंत्री बॉंडे म्हणाले शेतकऱ्याना सल्ला व मार्गदर्शनाकरिता ग्राम पंचायतीला कृषी सह्ययक नेमणार आहे. यावर्षी तापमानामुळे संत्रा बागा सुकल्या असल्याने सर्वेक्षण करून त्यावर लवकर निर्णय घेणार असून, संत्रा कलम संशोधनाकरिता काटोल मोर्शी केंद्राला 12 कोटी मंजूर असून संत्राचे नवं प्रजाती,केंद सक्षम बनविणार असल्याचे सांगितले.याप्रसंगी