कामठी :-महाराष्ट्र विधानसभेचे तत्कालीन विरोधी पक्ष नेता राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपा मध्ये प्रवेश केल्याने यांच्या रिक्त ठिकाणी कांग्रेस चे ज्येष्ठ नेता विजय वडडेटीवार यांच्या नावाची वर्णी लागली.
महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्ष नेतेपदी माजी आमदार विजय वड्डेटीवार यांची नियुक्ती झाली असून यांच्या नागपूर प्रथमागमनानिमित्त नागपूर विमानतळावर कामठी नगर परिषद चे नगराध्यक्ष मो शाहजहा शफाअत यांच्या शुभ हस्ते जंगी स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी माजी आमदार एस.क्यू.जमा, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस चे महासचिव मुजीब पठाण, कामठी नगर परिषद चे , माजी उपाध्यक्ष काशीनाथ प्रधान यासह कांग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते गण मोठ्या संख्येत उपस्थित होते.