कामठी:-कामठी शहरातील गोराबाजार रहिवासी व स्कुल ऑफ होम सायन्स मध्ये 10 व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींची राहत्या घरातील शौचालयाच्या छतातील लोखंडी हुक ला स्वतःच्या ओळणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सकाळी सहा वाजता घडली असून मृतक विद्यार्थिनींचे नाव राखी कैलास नायडू वय 15 वर्षे रा गोराबाजार कामठी असे आहे.आत्महत्येचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक विद्यार्थिनीने घरातील सर्व मंडळी झोपी असल्याचे संधी साधून अज्ञात कारणावरून घरातील शौचालय च्या लोखंडी हुक ला ओळणीने गळफास लावून आत्महत्या केली कित्येक वेळेपासून शौचालय च्या बाहेर न पडल्याने वडीलाने शंका कुशंका व्यक्त करीत दार तोडले असता सदर घटना निदर्शनास आली.
वेळीच आशा हॉस्पिटल मध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठुन घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनार्थ शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. यासंदर्भात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.मृतक मुलीच्या पाठीमागे कुटुंबात आई, वडील, तीन भाऊ असा आप्तपरिवार आहे.