राज्यमंत्री तथा भंडारा-गोंदिया पालकमंत्री डॉ.परिणय फुके हे भंडारा येथील सर्व नियोजित कार्यक्रम आटोपून रात्री 11:15 वाजता सडक-अर्जुनी येथे पोहचले. पण ताफ्यातील एक गाडी न दिसल्याने त्यांनी विचारपूस केली. लगेच ताफ्यातील वाहन चालकाची प्रकृती बिघडल्याचे कळले. त्यांनी लगेच वाहन चालकाला सडक-अर्जुनाच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले व दीड तास वाहनचालकाच्या प्रकृतीची दखल घेतली.
हा सारा घटनाक्रम पाहणाऱ्या वाहनचालकाला साहेबांची सामान्य नागरिकांशी असलेली तळमळ पाहायला मिळाली यातच वाहनचालक भावुक झाला .हे सर्व घटनाक्रम पाहून सामान्य रुग्णालयातील कर्मचारी वर्ग आवाक होते राज्यमंत्री महोदयांनी तळमळ पाहून त्यांच्यासारखा जनप्रतिनिधी आपल्या आयुष्यात कधीच बघितला नाही असे त्यांनी बोलून दाखविले.
सामान्य माणसाचा कुणी वाली नसतो हे सर्वश्रुत सत्य आहे. पण यालाही काही लोकप्रतिनिधी अपवाद असतात. महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री तथा गोंदिया-भंडारा चे पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी एका सामान्य कुटुंबातील वाहनचालकाला त्याच्या बिकट परिस्थितीत दिलेली मायेची उब, छातीत दुखत असलेल्या वाहनचालकाचा प्रथमोपचार हे सारे करतांना डॉ.परिणय फुके यांच्या चेहऱ्यावरील तळमळ बरेच काही सांगत होती.
सर्वत्र शांतता सर्वांचे चेहरे त्या वाहनचालकांच्या चेहऱ्याकडे, त्याची तळमळ छातीतील असहाय्य वेदना, एकीकडे मन सुन्न झाले असतांना डॉ.फुकेचे विशेष लक्ष त्या वाहनचालकाला जीवदान देणारे होते. पुढे त्या वाहनचालकाला गोंदिया येथील बाहेकार रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. आता त्याची प्रकृती स्थिर असल्याने सांगण्यात आले.