कामठी : ईद मिलन समारोह हे सर्व धर्माच्या एकतेचे प्रतीक असल्याचे मत राज्याचे ऊर्जा ,उत्पादन शुल्क व नागपूर , वर्धा जिल्ह्याचे पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जमियात उलमा हिंद कमेटी च्या वतीने एम एम कनिष्ठ महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर रमजान ईद च्या पर्वावर आयोजित ईद मिलन समारोह कार्यक्रमात मार्गदर्शन करताना व्यक्त केले
ईद मिलन समारोहात राज्याचे ऊर्जा उत्पादन शुल्क व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांची वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल नगराध्यक्ष शहाजा शहफाहत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त डॉक्टर यासीन कुद्दुस यांचे असते शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला जुनी कामठी चे ठाणेदार किशोर नगराळे ,तालुका विद्युत वितरण देखरेख कमिटीचे अध्यक्ष मोबिन पटेल ,नगरसेवक संजय कनोजिया, प्रतीक पडोळे लालसिंग यादव ,सुषमा शीलाम एडवोकेट आशिष वंजारी ,लाला खंडेलवाल तालुका भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष कपिल गायधने ,समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रवेज सिद्दिकी ,प्राचार्य डॉक्टर नसीम अख्तर उपस्थित होते
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले कामठी शहरातील विविध जाती-धर्माचे नागरिक एकत्र येऊन सर्व सण मोठ्या उत्सवात साजरे करीत असतात त्यामुळे कामठी शहर हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असल्याचे मत व्यक्त केले सोबतच शहराच्या विकासासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन सुद्धा केले कार्यक्रमाचे संचालन प्राचार्य डॉक्टर नसीम अख्तर यांनी केले व आभार प्रदर्शन डॉ नौशाद सिद्दिकी यांनी मानले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते
संदीप कांबळे कामठी