कामठी :-नागपूर शहर पोलीस आयुक्तालय परिमंडळ क्र 5 हद्दीत येणाऱ्या कळमना रोड हुन अवैधरित्या होत असलेल्या गोवंश जनावरांच्या तस्करीवर डिसीपी हर्ष पोद्दार यांच्या विशेष पथकाने वेळीच धाड घालून गोवंश जनावरांने लादून असलेला एक लाल रंगाचा ट्रक ताब्यात घेत अवैधरित्या कत्तलीसाठी जात असलेल्या 35 गोवंश जनावरांना नजीकच्या गोरक्षण शाळेत सुरक्षित हलवून जीवनदान दिल्याची यशस्वी कारवाहो नुकतीच केली असून
या कारवाहितुन जप्त ट्रक किमती 15 लक्ष रुपये तसेच जप्त 35 गोवंश जनावरे किमती 5 लक्ष 25 हजार रुपये असा एकूण 20 लक्ष 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी वाहनचालक वाहनमालक विरुद्ध गुन्हा नोंदवित अटक करण्यात आला असून अटक आरोपीचे नाव अश्फाक अली मुश्ताक अली खान वय 31 वर्षे रा गोडधई , शिवणी (मध्यप्रदेश) असे आहे तर पसार आरोपी मालमालक गोलू हाजी रा महेंद्रनगर नागपूर विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनीसार मध्यप्रदेश हुन ट्रक क्र एम पी 09 एच एफ 0483 ने 35 गोवंश जनावरे कळमना मार्गे ऑटोमोटिव्ह चौकाकडे जात असता रात्रगस्त वर असलेल्या डीसीपी हर्ष पोद्दार च्या विशेष पथकाने वेळीच ट्रक ताब्यात घेऊन ट्रक मधील गोवंश जनावरांना नजीकच्या गोरक्षण शाळेत सुरक्षित हलवून जीवनदान देण्यात आले.ही यशस्वी कारवाही डीसीपी पोद्दार यांच्या मार्गदर्शनार्थ विशेष पथकाचे पोलीस उपनिरिक्षक व्ही एम धोंगडे, पोलीस उपनिरीक्षक माधव शिंदे, मनीष भोसले, दुर्गेश माकडे,मनीष बुरडे,अनंता घारमोडे, भारत गरपडे,नितेश घाबर्डे,आदींनी केली असून पुढील तपास यशोधरा पोलीस स्टेशन च्या वतीने करण्यात येत आहे.
संदीप कंबळे कामठी