-नदीत पोहण्याचा मोह जीवावर बेतला
कामठी:-मौजमस्ती साजरा करण्याचा उद्देशाने पाचपावली नागपूर येथील सहा मित्र कन्हान नदीवर आले असता आनंदात नदीत पोहण्याचा मोह आवरता न आल्याने सहाही मित्रांनी नदीत उडी घेतली दरम्यान एक मित्र डोहात बुडत असल्याचे निदर्शनास येताच त्याचा बचाव करण्याच्या उद्देशाने हात पकडून मदतीची भूमिका साकारली मात्र त्यातील एक मित्र डोहातच बुडत असल्याने इतर पाच मित्रांनी स्वतःचा जीव वाचावीत नदीबाहेर पडले मात्र त्यातील एका तरुणाचा डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी अडीच दरम्यान कन्हान नदीच्या गादा गावाच्या तीरावर घडली.मृतक तरुणाचे नाव विलास उर्फ गोलू नरेश मानकर वय 22 वर्षे, रा पाचपावली नागपूर असे आहे तर बाचावलेल्या मित्रांमध्ये सुरेंद्र बेंदाडे, धर्मपाल मेश्राम, अश्विन लडे, सूरज वानखेडे, सचिन पाटील सर्व राहणार पाचपावली नागपूर असे आहे.
प्राप्त माहितीनुसार सदर सहाही मित्र सारख्या वयाचे असून आनंदोत्सव साजरा करण्याहेतु कन्हान नदीच्या गादा तीरावरील गादा गावातून गेल्यावर तिथे मासे पकडण्याचा छंद साजरा केल्यावर नदीत पोहण्याची इच्छा व्यक्त केल्याने सर्वांनी एकमताने सामूहिक उडी घेतली पोहता पोहता हा मोह अनावधानाने आवरता न आल्याने प्रसंगावष त्यातील एक मित्र नदीच्या डोहात बुडायला लागताच सोबतीला असलेल्या मित्रांनी डुबत असलेल्या मित्राला बाहेर काढीत बचाव करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र आलेल्या अपयशामुळे नाईलाजाने इतर मित्रांना आपला जीव वाचावीत नदी बाहेर पडावे लागले.
ही माहिती बचावलेल्या मित्रांनी स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन ला देताच पोलीस निरीक्षक संतोष बाकल, पोलीस उपनिरीक्षक राऊत, तहसीलदार अरविंद हिंगे, नायब तहसीलदार गणेश जगदाडे आदींनी घटनास्थळी भेट दिली मात्र बुडालेल्या तरुणाचा मृतदेह नदीत दिसत नसल्याने नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला असावा असा अंदाज व्यक्त करीत जवळपास 3 तास मृतदेहाचा शोध घ्यावा लागला अखेर त्या मृतदेहाचा शोध लावण्यात यशप्राप्त होताच मृतदेह बाहेर काढून पुढील उत्तरीय तपासणीसाठी नजीकच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.यासंदर्भात नवीन कामठी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.मात्र या घटनेने मृतक तरुणांच्या कुटुंबासह परिसरात शोककळा पसरली आहे.मात्र या घटनेत अति उत्साहात नदीत पोहण्याचा मोह जीवावर बेतला.
संदीप कांबळे कामठी