नागपूर : राज्यातील शंभर पोलिस उपअधीक्षकांच्या बदल्यांचे आदेश गुरुवार, ११ जुलै रोजी रात्री उशिरा काढण्यात आलेत. पोलिस महासंचालक कार्यालयाने हे आदेश काढले आहेत. बदली आदेशांनुसार, विदर्भातील अनेक जिल्ह्यांना नवे अधिकारी मिळणार आहेत. विदर्भात येणाऱ्या व येथून जाणाऱ्या अधिकाऱ्यांची एकूण संख्या ५० असून, त्यात महिलांचाही समावेश आहे.
राज्यातील शंभर पोलिस उपअधीक्षकांच्या बदल्यांचे आदेश गुरुवार, ११ जुलै रोजी रात्री उशिरा काढण्यात आलेत. पोलिस महासंचालक कार्यालयाने हे आदेश काढले आहेत. बदली आदेशांनुसार, विदर्भातील अनेक जिल्ह्यांना नवे अधिकारी मिळणार आहेत. विदर्भात येणाऱ्या व येथून जाणाऱ्या अधिकाऱ्यांची एकूण संख्या ५० असून, त्यात महिलांचाही समावेश आहे.
विदर्भातील नागपूर ग्रामीण, यवतमाळ, अमरावती ग्रामीण, अकोला शहर, मूर्तिजापूर, वाशीम, बुलडाणा, मलकापूर, मेहकर, मंगरूळपीर, राजुरा, पुलगाव, मोर्शी, पेंढारी (गडचिरोली), बाळापूर, हिंदरी (गडचिरोली), पवनी, एटापल्ली, जिमलगट्टा, ब्रह्मपुरी, गोंदिया, पुसद, कुरखेडा, भामरागड, सिरोंचा, अमरावती शहर, वरोरा येथील अधिकाऱ्यांना बदली देण्यात आली आहे.
बदली झालेले व बदलून येणाऱ्या अधिकाऱ्यांनी नावे अशी आहेत. अरुण जगताप (नगर-नागपूर ग्रा.), नीरज राजगुरू (कन्नड-गुन्हे शाखा यवतमाळ), रवींद्र पाटील (अमरावती-मुंबई शहर), दिलदार तडवी (मोर्शी-गुन्हे शाखा बुलडाणा), उमेश माने (अकोला-ठाणे), कल्पना भराडे (मूर्तिजापूर-अॅण्टी करप्शन), किरण धात्रक (वाशीम-गुप्तवार्ता ठाणे), बाबूराव महामुनी (बुलडाणा-कोल्हापूर), गिरीश बोबडे (मलकापूर-अमरावती परिक्षेत्र), रामेश्वर वैजने (मेहकर-बीड), पीयूष जगताप (यवतमाळ-वरोरा), शेखर देशमुख (राजुरा-चंद्रपूर मुख्यालय), प्रशांत परदेशी (ब्रह्मपुरी-पालघर), दिनेश कोल्हे (पुलगाव-औरंगाबाद शहर), रमेश बरकते (गोंदिया-बुलडाणा), बसवराज शिवपुजे (पेंढारी गडचिरोली-ठाणे ग्रा.), शशिकांत भोसले (हिंदरी गडचिरोली-ठाणे ग्रा.), किरण सूर्यवंशी (एटापल्ली-रोहा रायगड), तानाजी बरडे (भामरागड-फलटण,सातारा), संतोष गायकवाड (जिमलगट्टा-अक्कलकोट), समरसिंग साळवे (गडचिरोली-मनमाड), वैशाली माने (अमरावती शहर-गुन्हे अन्वेषण पुणे), प्रशांत स्वामी (सिरोंचा-राज्य नियंत्रण कक्ष मुंबई), सोहेल शेख (अकोला-अमरावती शहर), नंदा पराजे (वाशीम- गुन्हे अन्वेषण पुणे), सरदार पाटील (वरोरा-ठाणे शहर).
२१ नवे अधिकारी दाखल
पोलिस दलाच्या सेवेत नव्या दमाचे २१ अधिकारी रूजू झाले आहेत. परिविक्षाधीन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. यात स्वप्निल जाधव (राजुरा), तृप्ती जाधव (पुलगाव), कविता फडतरे (मोर्शी), प्रमोद कुडाळे (मेहकर), माधुरी बावीस्कर (यवतमाळ), रोहिणी सोळंके (बाळापूर), अश्विनी शेंडगे (पवनी), मिलिंद शिंदे (ब्रह्मपुरी), जगदीश पांडे (गोंदिया), पूनम पाटील (अमरावती ग्रा.), सचिन कदम (अकोला शहर), प्रिया ढाकणे (मलकापूर), अनुराग जैन (पुसद), जयदत्त भवर (कुरखेडा), अमोल भारती (पेंढारी गडचिरोली), कुणाल सोनवणे (भामरागड), राहुल गायकवाड (जिमलगट्टा), सुदर्शन पाटील (एटापल्ली), अमोल मांडवे (सिरोंचा), संकेत गोसावी (हिंदरी गडचिरोली), भाऊसाहेब ढाले (गडचिरोली) यांचा समावेश आहे.
नव्यांकडे गडचिरोलीची धुरा
गडचिरोली हा माओवादाने पोळून निघालेला जिल्हा आहे. येथील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून परिविक्षावधी काळ पूर्ण करून नव्याने पोलिस दलात दाखल झालेल्या अधिकाऱ्यांना येथे नियुक्ती देण्यात आली आहे. कुरखेडा उपविभागात जिथे काही दिवसांपूर्वी माओवाद्यांनी घडविलेल्या स्फोटात १५ जवान शहीद झाले होते, त्याची जबाबदारी जयदत्त भवर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.