रामटेक: आयुष्यतील ध्येय आताच ठरवा.या ध्येयाच्या दिशेने प्रयत्नशील राहा.विद्यापीठाच्या अभ्यासासोबतच स्पर्धा परीक्षांची तयारी करा.मुलींनी फक्त चुल आणि मुल यापुरते मर्यादित न राहता त्यांनीही स्वताच्या पायावर उभे राहावे. विद्यार्थ्यांनी पदवीची तीन वर्षे कसून अभ्यास करून आयुष्याचा पाया भक्कम करावा त्यासाठी महाविद्यालयाकडून आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देऊ असे प्रतिपादन अध्यक्ष स्थानावरून प्राचार्य डॉ संगीता टक्कामोरे यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाप्रसंगी केले. महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शन म्हणूनअर्जुन अकॅडमी कारधाचे संचालक राकेश राखडे,गणितज्ञ अतुल कोचे,सौ आशा शेंडे उपस्थित होते. अतुल कोचे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे स्वरूप समजावून सांगितले.
कमी वेळात गणिताचे प्रश्न कसे सोडवावेत याच्या साध्या पद्धती समजावून सांगितल्या.राकेश राखडे यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन स्पर्धा परिशांची तयारी कशी करावी हे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन प्रा सुनील कठाने व आभार प्रदर्शन प्रा नरेश आंबिलकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.