Advertisement
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत सभेसाठी चक्क चोरीची वीज वापरण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून वीजकंपनीने दोषींवर तात्काळ गुन्हा नोंदवावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेसाठी वीज चोरी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून यावर नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना सडकून टीका केली आहे.
माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या सभेत सरकारी वीज वापरल्यामुळे त्यांची निवडणूक रद्द करण्यात आली होती. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर अशा पद्धतीने चोरीची वीज वापरली जात असेल तर वीज कंपन्यांनी तात्काळ पोलिस चौकीत गुन्हा नोंदवावा असेही नवाब मलिक म्हणाले.