नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या विविध विभागामध्ये सेवा देणारे २४ अधिकारी व कर्मचारी शनिवारी सेवेतून निवृत्त झाले. सर्व सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शनिवारी (ता.३१) मनपातर्फे सत्कार करण्यात आला. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी समिती सभागृहामध्ये आयोजित सेवानिवृत्ती सत्कार कार्यक्रमाला निगम अधीक्षक (साप्रवि) मदन सुभेदार, सहायक निगम अधीक्षक (पेन्शन) नितीन साकोरे, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस आदी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते सर्व सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचा-यांचा शाल, श्रीफळ, तुळशीचे रोप आणि धनादेश प्रदान करुन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस यांनी केले. यावेळी डोमा भंडग, किशोर तिडके, दिलीप तांदळे उपस्थित होते.
सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचा-यांमध्ये आरोग्य विभागातील पदवीधर आयुर्वेदिक वैद्य आर.बी.फाळके, स्वास्थ निरीक्षक जी.बी.काटकर, अग्निशमन विभागातील लिडींग फायरमन एस.पी.वाठ, लॉरी ड्रायव्हर जे.एम.गोराडे, समाजकल्याण विभागातील सहायक अधीक्षक व्ही.बी.धनकर, कर व कर आकारणी विभागातील राजस्व निरीक्षक डब्ल्यू.एस.समर्थ, उच्च श्रेणी लिपीक ए.एम.बागडे, कनिष्ठ निरीक्षक आर.डब्ल्यू.लांजेवार, कनिष्ठ लिपीक बी.एन.बोरीकर, कनिष्ठ लिपीक शशीकांत जुमडे, गणेश मोहिते,प्रमुख अग्निशमन विमोचक बी.जे.नवले, देवी चिकीत्सक डी.आर.निखार, सहायक शिक्षक आशा हरणे, अरुण गोडघाटे, ज्ञानेश्वर बावीसकर, उत्तम ठेमसे, सैय्यद जिनत कौसर मुनीर अली, इसराईल खान करीम खान, यु.डी.टी. एन.आर. तिघरे, खलाशी श्रीकांत गोळे, चौकीदार कम चपराशी इंदुबाई रामटेके, चौकीदार कम चपराशी यशवंत कामठीकर, स.का. पंजाबराव पिल्लेवान यांचा समावेश आहे.