कन्हान : – श्रीदत्त मंदीर कांद्री येथे महिलांनी व्रत करित शिवशंकर पार्वती (गौरीपूजा) यांच्या पुजा अर्चना सह हरितालीका उत्सव साजरा करण्यात आला.
कांद्री येथील महिलांनी एकत्र येऊन श्रीदत्त मंदीरात पति परमेश्वराच्या दीर्घ आयुष्यमानाची मनोकामना सह हरितालिका व्रत (गौरीपूजा) महिलांनी गौरीशंकर देवाला प्रसन्न करण्याकरिता गौरी पारडीत घेऊन व्रत (उपवास) करीत पुजा अर्चना करून भारतीय पंरपरा जोपासत पुढचा पीडीला गौरी पुजे महत्त्व पटवून देत. महीलानी नव वारी साडी, हिरवा चूळा, नाकात नथ सुंदर परिधान सह भाव भक्तीने शिव गौरी व हरितालीकाचे विधिवत पुजा अर्चना करून हरिताली का उत्सव थाटात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास भावना पोटभरे, माला भक्ते, पुनम कुंभलकर, उज्वला भक्ते, सुनिता हिवरकर, सीता चौधरी, सागर निमपूरे ,न्रमता बावनकुळे, हिरा वंजारी, ज्योती हिवरकर, अर्चना शेन्दे, आरती पोटभरे, लता कामडे, ममता शेन्दे, शोभा वझे, कुसुम किरपान, प्रिती आंबीलढुके, सोनू निमपूरे, इंदिरा कुंभलकर, रूपाली हटवार आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होऊन उत्सवास सहकार्य केले.
घरघुती गणेशोत्सवाची सुरूवात
पांधन रोड गणेश नगर येथील महीलानी राहत्या घरी गौरी पुजन करून गणपती बाप्पाचे आगमनासह श्री गणेशा च्या पुजा अर्चनासह हर्षोउल्हासात गणेशोत्सवाची सुरूवात केली. याप्रसंगी प्रतिभा कुंभलकर, त्रिवेणी सरोदे, पुष्पा कुंभलकर, भाग्यश्री कुरजेकर, पूजा कुंभलकर आदी महिला उपस्थित होऊन घरघुती गणेशोत्सवाची सुरूवात करण्यात आली.