Published On : Tue, Sep 3rd, 2019

ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमध्ये पाणीच नाही

Advertisement

– पाण्याअभावी प्रवाशांची गैरसोय , नागपूर स्थानकावर प्रवासी महिलेची तक्रार

नागपूर: नागपूर रेल्वे स्थानकावर आलेल्या ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमध्ये पाणीच नव्हते. या प्रकरामुळे संतापलेल्या एका महिलेने उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयात लेखी तक्रार नोंदविली. त्यांच्या सोबत इतर प्रवाशांनीही कार्यालयात गोंधळ घातला.

Wenesday Rate
Wednesday01 Jan. 2025
Gold 24 KT 76,900 /-
Gold 22 KT 71,500 /-
Silver / Kg 86,700 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

१२१०२ हावडा – लोकमान्य टिळक टर्मिनस ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस रविवारी रात्री नियोजित वेळेत रवाना झाली. पहिले स्टेशन येण्यापूर्वीच बी-३ क्रमांकाच्या डब्यामधील दोन्ही बाजुच्या शौचालयांमध्ये पाणी येणे बंद झाले. याच डब्यातून शर्मिला सेनसागर या मुलासह प्रवास करीत होत्या. त्यांनी याबाबत सफाई कर्मचाºयांना सूचना दिली. त्यांनी टीटीकडे बोट दाखविले. यामुळे टीटीलासुद्धा पाणीनसल्याचे सांगितले. बिलासपूर स्थानकावर पाणी भरले जाईल, असे सांगून टीटीने वेळ मारून नेली. सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास ही गाडी बिलासपूर स्थानक सोडून पुढे रवाना झाली.

मात्र, शौचालयात पाणी नव्हते. यामुळे अन्य प्रवाशांसोबतच शर्मिला सेनसागर यांनी राग व्यक्त करीत जाब विचारला. बी-३ क्रमांकाच्या डब्यात जाऊन बघितले असता तिथेसुद्धा पाणी नव्हते. कर्मचारी, टीटीची कान उघाडणी केली. यानंतर अचानक नळाला पाणी आले. याचा अर्थस्पष्ट होता. टाकीत पाणी असले तरी ते बंद करून ठेवण्यात आले होते. पाणी आल्यावरसुद्धा फ्लशर मात्र, योग्यरित्या काम करीत नसल्याची त्यांची तक्रार आहे. ही गाडी नागपूर स्थानकावर पोहचल्यानंतर सेनसागर यांनी उपस्टेशन पाणी बंद का करून ठेवले? असा सवाल उपस्थित करीत लेखी तक्रार नोंदविली.

पाण्याविना शौचालये अस्वच्छ
कामाच्या निमित्ताने दर आठवड्यातच हावड्याला जाणे येणे करावे लागते. या मार्गावर नेहमीच अशीच अवस्था असते. पाणीच राहत नसल्याने शौचालये अस्वच्छ असतात, मनस्ताप सहन करीत प्रवास करावा लागत असल्याचे शर्मिला सेनसागर यांनी सांगितले.

Advertisement