Published On : Tue, Sep 3rd, 2019

आदिवासी विकास विभागाच्या विविध पुस्तिकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

Advertisement

मुंबई : आदिवासी विकास विभागाने तयार केलेल्या आश्रमशाळा संहिता-2019, आदिवासी विकास विभागाची माहिती पुस्तिका आणि मिशन शौर्य वीर गाथा या पुस्तिकांचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात झाले.

यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषी मंत्री डॉ.अनिल बोंडे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, आदिवासी विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनीषा वर्मा आदी उपस्थित होते.

Advertisement
Wenesday Rate
Wed 25 Dec. 2024
Gold 24 KT 76,300/-
Gold 22 KT 71,100/-
Silver / Kg 88,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आश्रमशाळा संहिता 2019 :- आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेच्या परिचलनासाठी आदिवासी विकास विभागामार्फत सन 2001 मध्ये पहिली स्वतंत्र आश्रमशाळा संहिता व सन 2005 मध्ये सुधारित आश्रमशाळा संहिता तयार करण्यात आली आहे. केंद्र शासनाने Right to children to free and compulsory Education Act 2009 पारीत करुन तो भारत सरकारच्या दिनांक 27 ऑगस्ट, 2009 च्या राजपत्रात प्रसिध्द केला आहे. केंद्र शासनाने पारित केलेला कायदा राज्यात लागू झाला असल्यामुळे या कायद्यातील सर्व तरतूदींना अनुसरुन तसेच शासन स्तरावर आश्रमशाळा धोरणात काही बदल झाल्याने आश्रमशाळा संहितामध्ये बदल करणे आवश्यक आहे. याशिवाय शैक्षणिक गुणवत्तेच्या संदर्भात मार्गदर्शक सूचना, शालेय व्यवस्थापन, वसतिगृह व्यवस्थापन, आरोग्य, आहार, स्वच्छता, उपचार, बालसुरक्षा व संरक्षण इत्यादी विषयसुध्दा समाविष्ट करण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने सर्वसमावेशक अशी आश्रमशाळा संहिता नव्याने 2019 मध्ये तयार करण्यात आली आहे.

आदिवासी विकास विभागाची माहिती पुस्तिका :- आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी जनतेसाठी त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या सर्व योजनांची तसेच विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालयांची माहिती एकत्रित पुस्तक स्वरुपात राहावी व त्याचा उपयोग आदिवासी जनतेस व्हावा यासाठी माहिती पुस्तिका तयार करण्यात आली आहे.

मिशन शौर्य वीर गाथा :- व्यक्तीमत्व विकासासाठी आत्मविश्‍वास हा महत्वाचा घटक आहे. साहसी खेळातून तो वृद्धिंगत होण्यास मदत होते. यादृष्टीने आदिवासी विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढविण्यासाठी माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याची मोहीम मिशन शौर्य या नावाने प्रायोगिक तत्वावर सन 2017-18 मध्ये सुरु करण्यात आली. यामध्ये 5 आदिवासी विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट शिखर सर करण्याची धाडसी मोहीम पूर्ण केली. या मोहिमेचे यश पाहता सन 2018-19 मध्ये मिशन शौर्य-2 मोहीम राबविण्यात आली आहे. या मोहिमेमधील 11 विद्यार्थ्यांपैकी 9 विद्यार्थ्यांनी माऊंट एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत केले आहे. या मोहिमेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची व प्रशिक्षकांची ओळख व त्यांची पार्श्वभूमी व त्यांनी घेतलेले अविरत परिश्रम याबाबतची माहिती या पुस्तकात नमूद केली आहे.

Advertisement