नागपूर : नागपूर शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नेहरू नगर झोनअंतर्गत येणाऱ्या अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचले. नेहरू नगर झोन सभापती समिता चकोले यांनी संबंधित वस्त्यांमध्ये दौरा करून तातडीने पाणी काढण्याचे आणि उन्मळून पडलेली झाडे उचलण्याचे आदेश दिले.
सभापती समिता चकोले यांनी नेहरू नगर झोन अंतर्गत येणाऱ्या पवनशक्तीनगर, मातानगर, श्रावणनगर आदी परिसराला भेट दिली. या ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. यासंदर्भात तातडीने दखल घेत सभापती समिता चकोले यांनी वस्त्यांना भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी उपअभियंता शिंगणजुडे, आरोग्य निरिक्षक पोकडे, राजेंद्र चकोले उपस्थित होते.