नागपूर: श्री ़श्री फाऊंडेशन या समाजोपयोगी उपक्रम राबविणार्या संस्थेने आतापर्यंत कामठी-मौदा या भागात बारा आरोग्य शिबिरे घेतली असून या शिबिरांतून आतापर्यंत 30 हजारावर नागरिकांनी लाभ घेतला. या नागरिकांची नि:शुल्क तपासणी करून उपलब्ध असलेले औषधोपचार करण्यात आले.
कापसी येथे आज झालेल्या आरोग्य शिबिरात 232 नागरिकांना मोतिबिदू असल्याचे आढळले असून यापैकी 37 रुग्णांना शस्त्रक्रियेचा सल्ला शिबिरातील डॉक्टरांनी दिला. सुमारे 95 रुग्णांच्या दातांवर उपचार करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन आज पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते कापसी येथे झाले. याप्रसंगी श्री श्री फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संकेत बावनकुळे, अनिल निधान, मोबीन पटेल, रमेश चिकटे, नरेश भोयर, गजानन कुथे, मनोज चवरे, राजकुमार घुले,सरपंच श्यामराव आडोळे, खेमराज हटवार, सरपंच आशाताई पाटील. नरेश मोटघरे, भोजराज हटवार, मुकुंद क्षीरसागर, सेवक उईके आदी उपस्थित होते.
शिबिरात 71 नागरिकांची रक्त तपासणी करण्यात आली. 195 जणांची जनरल मेडिसिन तपासणी, किडणीच्या 20 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी 3 जणांना शस्त्रकक्रियेचा सल्ला देण्यात आले. 57 नागरिकांची ईसीजी तपासणी झाली. दंत विभागाने 95 रुग्णांच्या दातांवर जुजबी शसत्रक्रिया केली. 177 जणांनी रक्तदाबाची तपासणी करून घेतली. या शिबिरात एकूण 1100 रुग्णांची तपासणी करवून घेतली.
डॉक्टरांच्या चमूमध्ये डॉ. मनीषा राजगिरे, डॉ. अमोल पाटील, डॉ. पराग देशमुख, डॉ. स्वाती वानीकर, डॉ. वृषाली नवलकर, डॉ. श्वेता ठाकरे, डॉ. गुंडावार, डॉ. वणीकर, डॉ. गुरु, डॉ. वर्घने, डॉ. कपिल देवतळे, डॉ. राहूल लामसोंगे, डॉ. पाटील, डॉ. हजारे, डॉ. संदीप, डॉ. देशमुख, डॉ. रघुवंशी, डॉ. भोयर, डॉ. गिल्लूरकर हॉस्पिटलची टीम आदींचा सहभाग होता.
शिबिर यशस्वी करण्यासाठी श्री श्री फाऊंडेशनतर्फे महेश बोंडे, राजूभाऊ गोल्हर, अरुण सावरकर, हर्षल हिंगणीकर, विकास धारपुडे, प्रीतम लोहासारवा, बापूराव सोनवने, रोहित पंचबुध्दे, विनोद मोरे, सुजीत महाकाळकर, सचिन घोडे, कपिल गायधने, गजानन तिरपुडे, सुधीर अपाले, अर्चना सपाटे, रामकृष्ण बोढारे, प्रवीण आगासे, प्रमोद ढोबळे, अजय अरुण सावरकर, हर्ष वानखेडे, जितू मेरकुळे, निखिल इंगळे, सारंग पिपळे, अजय बिसेन, शिवशंकर फुलझेले, वाहीद पठाण आदींनी प्रयत्न केले.