नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने दक्षिण नागपुरातील सक्करदरा तलाव, राजाबाक्षा हनुमान देवस्थान व रमणा मारोती हनुमान देवस्थानांच्या विकास कामांचे उद्या मंगळवारी (ता.१०) सायंकाळी पाच वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे.
विकास कामांमध्ये सक्करदरा तलाव संवर्धन व सौंदर्यीकरण, राजाबाक्षा हनुमान मंदिर देवस्थान सौंदर्यीकरण तथा रमणा मारोती हनुमान देवस्थान सौंदर्यीकरण या कामांचा समावेश आहे.
रेशीमबाग चौकातील महात्मा फुले सांस्कृतिक सभागृह येथे आयोजित समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहतील. महापौर नंदा जिचकार समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवितील.
याप्रसंगी खासदार डॉ.विकास महात्मे, आमदार नागो गाणार, आमदार प्रकाश गजभिये, आमदार जोगेंद्र कवाडे, आमदार प्रा. अनिल सोले, आमदार गिरीश व्यास, आमदार सुधाकर देशमुख, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार डॉ. मिलिंद माने, आमदार सुधाकर कोहळे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, मनपा आयुक्त अभिजीत बांगर, बसपाच्या पक्षनेत्या वैशाली नारनवरे, राकाँचे पक्षनेते दुनेश्वर पेठे, शिवसेना पक्ष नेते किशोर कुमेरिरया, स्थापत्य समिती सभापती अभय गोटेकर, धंतोली झोन सभापती लता काडगाये, नेहरूनगर झोन सभापती समिता चकोले, आरोग्य समिती उपसभापती नागेश सहारे, नगरसेविका रिता मुळे, नगरसेविका स्नेहल बिहारे, नगरसेवक संजय महाकाळकर, नगरसेविका मंगला गवरे, नगरसेविका रेखा साकोरे, जलप्रदाय समिती सभापती विजय झलके, नगरसेवक विजय चुटेले, नगरसेविका हर्षला साबळे, क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, मुख्य अभियंता उल्हास देबडवार, अधीक्षक अभियंता (लोककर्म) मनोज तालेवार यांची प्रमुख उपस्थिती राहिल.
कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.