पाराशिवनी: – पाराशेवनी नगरपंचायत पााराशिवनी च्या विषय समिती निवडणुक बिनविरोध संपन्न होऊन स्थायी समिती – अध्यक्ष प्रतिभा कुभलकर , उपाध्यक्ष ,स्वास्थ आरोग्य सभापती माधुरी श्याम भिमटे,बांधकाम – देवानंद वाकोडे , – पाणी पुरवठा – सभापती आशा रमेश वैद्य, शिक्षण /महिला -मनिषा धुुरई यांची निवड करण्यात आली आहे.
बुधवार (दि.१२) ला नगर पंचायत सभागृह पाराशिवनी येथे निवडणुक अधिकारी मा वरूण कुमार सहारे तहासिलदार पाराशिवनी व मुख्याधिकारी भारत नंदनवार यांच्या उपस्थितीत नगरपरिषद कार्यालयात विषय समिती निवडणुक घेण्यात आली. यात स्थायी समिती करिता पद सिध्द अध्यक्ष प्रतिभा कुभलकर , बांधकाम सभापती करिता देवानंद वाकोड़े, आरोग्य व स्वच्छता सभापती – माधुरी श्याम भिमटेे, पाणी पुरवठा सभापती- आशा रमेश वैद्य, शिक्षण व महिला बालकल्याण सभापती – मनिषा धुरई हयाचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असुन विरोधात एक ही अर्ज दाखल करण्यात न आल्याने निवडणुक अधिकारी मा वरूण कमार सहारे आणि मुख्य अधिकारी भारत नंदनवार हयानी स्थायी समिती पदी – प्रतिभा कुभलकर, बांधकाम सभापती – देवानंद वाकोडे , आरोग्य व स्वच्छता सभापती – माधुरी श्याम भिमटे , पाणी पुरवठा सभापती – आशा रमेश वैद्य, शिक्षण व महिला बालकल्याण सभापती -मनिषा धुरई हयाची बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडणुकी करिता सत्ता पक्षाचे ११ नगरसेवक, नगरसेविका तर विरोधी पक्षाचे काग्रेस चे दोन्ही सदस्य ब शिवसेना चे चार सदस्या पैकी दोन सदस्य दिपक शिवरकर आणि टिकाराम परतेती नगरसेवक अनु पस्थित होते नगर पंचायत चे १७ सदस्या पैकी. १५नगर सेवक उपास्थीत होते विषय समिती निवडणुक बिनविरोध व शांततेत संपन्न करण्यात आल्या बद्दल नगरसेवक उपााध्यक्षा माधुरी भिमटे ,निकिता गोन्नाटे,अनिता भड,गुलनाज शेख ,अविनाश भिमटे ,राहुल नाखले ,डिगांबर खुबाळ्करआदीने नव्याने
विषय समिती सभापती पद्दी निवड झाल्या बद्दल स्थायी सामिती अध्यक्षा प्रतिभा कुभलकर ,उपाध्यक्ष सभापती माधुरी भिमटे , सभापती आशा वैद्य , सभापती मनिषा धुरई व सभापती देवानंद वाकोड़े यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
तालुका प्रातिनिधी कमल यादव ,पाराशिवनी