रामटेक: उच्च प्राथमिक शाळा कांद्री वस्ती येथे मागील सहा वर्षापासून कार्यरत असलेले प्रशांत जांभुळकर यांना नुकताच महाराष्ट्र शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी हा पुरस्कार मुंबई येथील बांद्रा या ठिकाणी प्रदान केला.
प्रशांत जांभूळकर यांनी मिळविलेला मान हा राज्यस्तरीय असून त्यांनी गावाचे तसेच ग्रामपंचायतचे नाव सुद्धा वाढविलेले आहे. करिता त्यांचे ग्रामपंचायतच्या वतीने आणि इतर गावकरी मंडळीच्या वतीने शाल ,श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. सरपंच परमानंद शेंडे यांनी आदर्श शिक्षक कसा असावा याविषयी थोडक्यात मार्गदर्शन केले .त्याचप्रमाणे उपस्थितांनी सुद्धा आपल्या भाषणांमधून शुभेच्छा दिल्या .
यावेळी ग्रामपंचायत कांद्री( खदान)चे सरपंच परमानंद शेंडे ,उपसरपंच मंजित बहेलिया ,सदस्य विक्की देशमुख ,मोरेश्वर सलामे ,लक्ष्मीताई इडपाते, मनीषा वाघमारे, सचिन डोले,प्रीतम हारोडे, सर्व अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील ,ग्रामपंचायत कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. सूत्रसंचालन ओमकार मुळेवार यांनी केले.