कामठी :- दहा दिवसीय गणेशोत्सवाच्या श्री गणेश मूर्ती विसर्जन करायला गेलेल्या तरुणाचा कळमना रोड वरील चौपदरी रस्ता बांधकामाच्या खोदलेल्या खोल खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज 12 सप्टेंबर ला सकाळी साडे अकरा दरम्यान घडली असून मृतक तरुणाचे नाव कुणाल हरिभाऊ उमरेडकर वय 19 वर्षे रा राजलक्ष्मी नगर कळमना असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार राजलक्ष्मी नगर नाका नंबर 4 कळमना येथे श्री बाळ गणेश उत्सव मंडळ च्या वतीने स्थापित श्री गणेशमूर्तीचे आज विसर्जन करायला नाचत गाजत जाऊन कळमना रोड वरील हॉटेल रिलॅक्स जवळील चौपदरी रस्ता बांधकामासाठी खोदून ठेवलेल्या नाल्यात विसर्जन करायला जवळपास आठ तरुण याखोल पाण्यात उतरले त्यातील मृतज तरुण कुणाल उमरेडकर, शेख अजीब शेख शरीफ वय 22 वर्षे,शुभम ठेंबरे वय 18 वर्षे दोन्ही राहणार कळमना हे पाण्यात बुडायला लागले त्यातील काही मित्र सुखरूप बाहेर पडले मात्र तरुण बुडाला .
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बाकल आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी बचाव पथकद्वारे मृतदेह बाहेर काढून त्वरित शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले मात्र तोवर डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.यासंदर्भात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करीत मृतकाच्या पार्थिवावर शवविच्छेदन करण्यात आले.मृतकाच्या पाठीमागे आई, वडील, व दोन बहिणी असा आप्तपरिवार आहे तसेच मृतक तरुण हा बारावी वाणिज्य शाखेतील विद्यार्थी होता.या घटनेने मात्र श्री गणेश विसर्जन करणे मृतकाला चांगलेच भोवले हे इथं विशेष.
संदीप कांबळे कामठी