Advertisement
हिंगणाचे माजी आमदार विजय घोटमारे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले हाती…
मुंबई : भाजपाचे हिंगणा मतदारसंघातील माजी आमदार विजय घोटमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
एकीकडे भाजप – शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रवेश करुन घेत असतानाच आज भाजपलाच राष्ट्रवादीने जोरदार धक्का दिला आहे.
नागपूर जिल्ह्यातील हिंगणा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेले भाजपाचे माजी आमदार विजय पांडुरंग घोटमारे यांनी आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
यावेळी माजी मंत्री रमेश बंब, नागपूर ग्रामीणचे कार्याध्यक्ष राजू राऊत, प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ ताकसांडे उपस्थित होते.