नवीन वाहतूक शुल्क रद्द करण्याची मागणी.
कामठी :-नुकताच परिवहन नियमात मध्ये शासनातर्फे जो बदल करण्यात आला त्यात दुचाकी चालक चारचाकी चालक त्यापेक्षा अधिक मालवाहतूक वाहना चालकावर शासन धारा वाढत्या वाहतूक नियमाबद्दल रोष निर्माण होत असून हे नियम त्वरित शिथिल करावे
या मागणीचे निवेदन भारतीय विद्यार्थी सेना कामठी द्वारा तहसीलदार अरविंद हिंगे यांच्यामार्फत शासनाला यांना देण्यात आले दिलेल्या निवेदनानुसार या नियमाने पोलिस आणि नागरिक तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होत आहे
व पोलिसाची मनमानी आणि नागरिका प्रति असभ्य वागणूक वाढत आहे त्याकरिता शांतता भंग न व्हावी करिता नवीन लागलेले नियम शितील करावे अशा मागणीचे निवेदन भारतीय विद्यार्थी सेना तर्फे सादर करण्यात आले निवेदन सादर करतेवेळी उपजिल्हाप्रमुख विनोद यादव वसंत सातपुते तालुकाप्रमुख राधे चहांदे अतुल फुले बालू शुक्ला चेतन गड्डमवार जीशान शेख सोहेल खान शुभम बोरकर आणि विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते