कामठी:- दिनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय उपजीविका अभियान अंतर्गत काल कामठी नगर परिषद प्रांगणात आयोजित स्वस्थ एस एच जी कार्यक्रम उत्साहात पार पडला असून या कार्यक्रमा अंतर्गत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य ऍड सुलेखाताई कुंभारे यांच्या शुभ हस्ते पंतप्रधान आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत एकूण 75 लाभार्थ्यांना ई कार्ड वितरण करण्यात आले.
तसेच एकूण 11 महिला बचत गटांना प्रत्येकी 10 हजार रुपयांचा फिरता निधी ।वाटप करण्यात आला.त्याचबरोबर चार वस्ती स्तर संघ यांना प्रत्येकी पन्नास हजार रूपयाचा फिरता निधी देण्यात आला. दरम्यान सर्वासाठी घरे 2022 प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत एकूण पात्र 200 लाभार्थ्यांना पहिला हफ्ता 40 हजार रुपये वितरित करण्याची घोषणा करण्यात आली.तसेच वाढीव पाणी पुरवठा योजने अंतर्गत 28.82लक्ष रूपये कामाचे उदघाटन करण्यात आले तसेच नगर परिषद प्रशासकीय इमारत 5 कोटी रुपयाच्या बांधकाम चे भूमिपूजन करन्यात आले , दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत इतर कामांचे सुद्धा भूमिपूजन व लोकार्पण थाटात करण्यात आले.
हा कार्यक्रम माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे यांच्या मुख्य उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी मुख्याधिकारी रमाकांत डाके, कामठी नगर परिषद चे अध्यक्ष मो शाहजहा शफाअत, उपाध्यक्ष शहिदा कलिम अन्सारी, माजी उपाध्यक्ष अजय कदम, भाजप शहराध्यक्ष विवेक मंगतानी, लाला खनडेलवाल , माजी उपाध्यक्ष अब्दुल मतीनं खान, नगरसेविका ममता कांबळे, नगरसेविका सावला सिंगाडे, सुषमा सीलाम, रमा गजभिये, लालसिंह यादव , राजू पोलकमवार, रघुवीर मेश्राम आदी नगरसेवक नगरसेविकागण प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी रमाकांत डाके, संचालन शहर अभियान व्यवस्थापक प्रदीप तांबे, तर आभार विशाल गजभिये यांनी मानले.
संदीप कांबळे कामठी