Published On : Fri, Sep 27th, 2019

तहसील कार्यालय समोर उभ्या असलेल्या कार मधून बॅग लंपास

Advertisement

कामठी:- कामठी तहसील कार्यालय समोर एका बँक मॅनेजर ने तहसील कार्यालय समोर कार उभी करून तहसील कार्यालयात गेले असता पाळीवर असलेल्या अज्ञात चोरट्याने कारच्या उजव्या बाजूची काच फोडून कार मध्ये असलेली काळ्या रंगाची कार चोरून नेऊन पळ काढल्याची घटना दिवसाढवळ्या आज दुपारी सव्वा तीन दरम्यान घडली .हे अज्ञात चोरटे थोड्या दूर अंतरावरील रणाळा भागात जाऊन बॅगची तपासणी केली असता बॅग मध्ये बँक कार्यालयीन कागदपत्रासह एकही रुपया नसल्याने चोरट्याने बॅग रस्त्याच्या कडेला जाऊन पळ काढला यामुळे या अज्ञात चोरट्यांची चोरीचा यशस्वी प्रयत्न फासला असून तेल गेले तूपही गेले आणि हाती आले धुपाटने अशी अवस्था झाली….

प्राप्त माहिती नुसार पीडित फिर्यादी नागपूर शहर आजनी शाखेतील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे बँक प्रबंधक अनिल माधवराव देशभ्रतार वय 52 वर्षे रा पंचशील नगर नागपूर हे कामठी येथील भरत टाऊन च्या एका मालमत्तेची अपदा संदर्भात कारवाही करण्यास्तव असलेले संबंधित दस्तावेज कामठी तहसील महसूल चे नायब तहसीलदार रणजित दुसावार यांना देण्यासाठी स्वतःच्या मारुती बलोणो कार क्र एम एच 49 बी बी 3349 ने जाऊन तहसिल कार्यालय समोरील रस्त्याच्या कडेला उभे करून तहसील कार्यालयात गेल्यानंतर नजर ठेवत पाळीवर असलेल्या अज्ञात चोरट्याने दिवसाढवळ्या सदर उभ्या असलेल्या कार च्या उजव्या बाजूचे काच फोडून काच मध्ये असलेले काळ्या रंगाची बॅग घेऊन रणाळा मार्गे पळ काढला.

Gold Rate
Monday 31March 2025
Gold 24 KT 90,500 /-
Gold 22 KT 84,200 /-
Silver / Kg 101,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

थोड्या दूर अंतरावर गेल्यानंतर बॅग ची पाहणी केली असता बॅग मध्ये असलेले बँक कार्यालय संबंधित असलेले चेकबुक, कागदपत्र तसेच चाब्या दिसल्याने अज्ञात चोरट्यांची आनंदावर विर्जन पसरले व चोरटे ही बॅग रस्त्याचा कडेला फेकून पुढे निघाले .तर तहसील कार्यालय चे कामे आटोपून कार जवळ आलेल्या बँक प्रबंधक ला कार चा काच फुटला असून बॅग चोरी झाल्याची घटना निदर्शनास येताच एकच धक्का बसला यासंदर्भात फिर्यादी ने कामठी तहसील कार्यालयात फिर्याद द्यायला गेले असता वेळीच ओम नगर रहिवासी दोन शाळकरी मुलांचा फिर्यादीला तुमची बॅग इथे पडली असल्याची माहिती मिळताच फिर्यादीने त्वरित ओम नगर रणाळा गाठून त्या शाळकरी मुलाकडून बॅग हस्तगत करून त्या मुलांनी दिलेल्या माणुसकीच्या परिचयातुन कौतुक केले व सदर घटनेसदर्भात कामठी पोलिस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कार च्या झालेल्या नुकसान संदर्भात भादवी कलम 427 अनव्ये गुन्ह्याची नोंद करीत न्यायालयात दाद मागण्याचे सांगितले.मात्र भर दिवसा एका बँक मॅनेजर च्या कार मधून काच फोडून बॅग लंपास होणे ही घटना विचाराधीन आहे मात्र बॅग मध्ये नगदी रक्कम नसल्याने अनर्थ टळला.

बॉक्स:-कामठी तहसील कार्यालयात महसूल तसेच रजिस्ट्री कार्यालय संदर्भात दररोज अनेक नागरिक लाखो रुपयांच्या आर्थिक व्यवहार करण्याहेतु येत असतात तसेच विधानसभा निवडणूक हालचाली सुद्धा या तहसील कार्यालय मधून होत असल्याने सदर प्रकारची घटना घडल्याने नागरिकांची सुरक्षितता चा प्रश्न उदभवत आहे.

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement