Published On : Wed, Oct 2nd, 2019

मनपा आयुक्तांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गोळा केला ‘प्लास्टिकचा कचरा’

Advertisement

‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत ‘प्लाग रन’ : स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने दहाही झोनमध्ये आयोजन

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या सिव्हील लाईन येथील मुख्यालयातून बुधवारी (ता. २) सकाळी मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्या नेतृत्वात अधिकारी, विभाग प्रमुख, कर्मचारी, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी हातात पोते घेऊन रस्त्यावर निघाले. रस्त्यावर पडलेला प्लास्टिकचा कचरा स्वत: मनपा आयुक्तांनी उचलत नागरिकांनाही प्लास्टिक न वापरण्याचे आवाहन केले. स्वत: मनपा आयुक्तांनी घेतलेल्या पुढाकाराने रस्त्यावरील नागरिकही या मोहिमेत सहभागी झाले आणि ‘प्लास्टिकमुक्त नागपूर’साठी सुरू करण्यात आलेल्या जनजागरण मोहिमेत पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले.

Gold Rate
Tuesday18 March 2025
Gold 24 KT 88,700 /-
Gold 22 KT 82,500 /-
Silver / Kg 100,900 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

निमित्त होते नागपूर महापालिकेअंतर्गत ११ सप्टेंबर ते २७ ऑक्टोबर दरम्यान ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून बुधवारी (ता. २) नागपूर महानगरपालिका आणि स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, तसेच मनपाच्या दहाही झोन कार्यालयाच्या वतीने ‘प्लॉग रन’चे आयोजन करण्यात आले होते. मनपा मुख्यालय सिव्हील लाईन येथे आयोजित कार्यक्रमात मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासह अतिरिक्त आयुक्त राम जोशी, स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे, आरोग्य उपसंचालक डॉ. भावना सोनकुसळे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनील कांबळे, आरोग्य अधिकारी (दवाखाने) डॉ. सरीता कामदार, स्वच्छ भारत अभियानाचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, योगपटू धनश्री लेकुरवाळे, योगशिक्षक मोरेश्वर वरघने, भारताच्या दिव्यांग क्रिकेट संघातील खेळाडू गुरुदास राऊत, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, हिवताप अधिकारी जयश्री थोटे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, क्रीडा अधिकारी पियूष आंबुलकर, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी, सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, ऑरेंज सिटी रनर्स असोशिएशनचे अमित पंचमठिया व सदस्य, गांधीबाग स्केटिंग क्लबचे स्वप्नील समर्थ यांच्यासह मनपाचे अधिकारी, विभागप्रमुख, कर्मचारी, अग्निशमन विभागाचे कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रारंभी सर्व उपस्थितांना प्लास्टिक मुक्त नागपूर शहर साकारण्यात आपण सहभागी होऊ या आशयाची शपथ अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली. यानंतर योग शिक्षक मोरेश्वर वरघने आणि योगपटू धनश्री लेकुरवाळे यांनी जीवनात योगाचे महत्त्व सांगत प्रात्यक्षिके करून दाखविली. उपस्थितांनीही योगा करीत सुदृढ आयुष्याचे धडे घेतले. यानंतर मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्या नेतृत्वात आणि अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या मार्गदर्शनात मनपापासून ‘प्लॉग रन’ला सुरुवात झाली. सर्वात पुढे गांधीबाग स्केटिंग क्लबचे स्केटर्स हातात ‘से नो टू प्लास्टिक’, ‘प्लास्टिकला आयुष्यातून हद्दपार करा’ असे संदेश असणारे फलक घेऊन प्लॉग रनचे नेतृत्व करीत होते. ग्रीन व्हिजील फाऊंडेशन, रा.पै. समर्थ स्मारक समिती, ऑरेंज सिटी रनर्स असोशिएशनचे स्वयंसेवक ‘प्लॉग रन’मध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. चेहऱ्यावर मास्क, हातात मोजे घालून अधिकाऱ्यांसह सर्व स्वयंसेवक रस्त्यावर पडलेले प्लास्टिक जमा करीत होते. मनपा मुख्यालय, विधानभवन चौक, मिठा नीम दर्गा, आकाशवाणी चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, व्हिसीए ग्राऊंड असे मार्गक्रमण करीत प्लॉग रन मनपा मुख्यालयात पोहोचली. प्लास्टिकमुक्तीच्या घोषणा देत जमा केलेले प्लास्टिक पुनर्प्रक्रियेसाठी पाठविण्यात आले.

दहाही झोनमध्ये ‘सिंगल यूज प्लास्टिकमुक्त’ अभियान
मनपाच्या दहाही झोन कार्यालयामध्येसुद्धा प्लास्टिकमुक्तीचा संदेश देण्यासाठी ‘प्लॉग रन’ आणि विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लक्ष्मी नगरअंतर्ग धंतोली उद्यान, सावरकर नगर चौक येथे, धरमपेठ झोन अंतर्गत अंबाझरी उद्यान, वर्मा लेआउट येथे, हनुमान नगर झोनअंतर्गत दुर्गा नगर स्कूल, जवाहन नगर परिसरात, धंतोली झोन अंतर्गत सुभाष रोड उद्यान, नेहरूनगर झोनअंतर्गत दत्तात्रय नगर उद्यान, गांधीबाग झोन अंतर्गत गांधीबाग उद्यान मार्केट, सतरंजीपुरा झोनअंतर्गत शांतीनगर उद्यान, शांतीनगर परिसरात, लकडगंज झोनअंतर्गत आंबेडकर उद्यान, आंबेडकर चौक, सेंट्रल एव्‍हेन्यू परिसरात, आसीनगर झोनअंतर्गत वैशाली नगर उद्यान, मंगळवारी झोनअंतर्गत मंगळवारी बाजार, जरीपटका मार्केट येथे मनपा उपायुक्त आणि झोन सहायक आयुक्तांच्या नेतृत्वात ‘प्लॉग रन’चे आयोजन करण्यात आले. यामाध्यमातून जमा झालेले प्लास्टिक पुनर्प्रक्रियेसाठी पाठविण्यात आले. यापुढे सिंगल यूज प्लास्टिक न वापरण्याचे आवाहन करीत उपस्थितांना शपथ देण्यात आली.

Advertisement
Advertisement