कामठी :-कामठी पंचायत समिती पशुसंवर्धन विभागाच्या वतीने एस्कड योजनेअंतर्गत कामठी तालुक्यातील वडोदा येथे आयोजित पशुपालक जनसंपर्क शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला असून या शिबिरात पशुवैद्यकीय अधिकारी व तज्ञानी उपस्थितांना विविध विषयांवर सखोल असे मार्गदर्शन केले.
या शिबिरात वडोदा, चिखली, निंबा, सावळी, भुगाव, एकर्डी, गुमथळा, केसोरी, अंबाडी, उमरी, शिवणी, नान्हा मांगली, गारला, सेलू आदी गावातील एकूण 137 पशुपालकांनी सहभाग नोंदविला होता.यावेळी पशुसंवर्धन विषयक विविध रोगावरील माहिती तसेच लसीकरणाचे महत्व, पशुआहार, बहुवार्षिक वैरण, दुग्धव्यवसायाचे अर्थशास्त्र, शेळीपालन, स्वच्छ दुग्ध उत्पादन अशा धडीपत्रिका व इतर साहित्य पशुपालकाना पुरविण्यात आले तसेच पशुसंवर्धन विषयक चित्रफिती दाखविण्यात आल्या.
सदर शिबिरास कामठी पंचायत समिती चे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथील पशुवोस्तार व शिक्षण विभागाचे डॉ सारिपुत्त लांडगे,डॉ नामदेव राऊत, पशुधन विकास अधिकारी डॉ लीना पाटील, डॉ श्रद्धा वासनिक, डॉ गोरले, डॉ येवतकर, डॉ खोडनकर, डॉ वैशाली चलपे, डॉ मंगला टीचकुले, आदींनी उपस्थिती दर्शवित समयोचित असे मार्गदर्शन केले. तर या शिबिराच्या यशस्वीतेसाठी पशुधन विकास अधिकारी डॉ लीना पाटील, डॉ वैशाली चलपे, पशुसंवर्धन विभागाचे नागपुरे, झाडे, मेंढे,श्रीरामे, तसेच ग्रा प कर्मचारी व वडोदा ग्रा प चे ग्रामसेवक वांढरे यांनी मोलाची भूमिका साकारली
संदीप कांबळे कामठी