Advertisement
कामठी:-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी-नागपूर मार्गावरील चुंगी नाक्याजवळ एका 65 वर्षोय अनोळखी वृद्धाचा भुकेच्या व्याकुळतेने मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 3 वाजता घडली .
घटनेची माहिती कळताच जुनी कामठी पोलिसानी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळा चा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेत अकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.मृतकाची ओळख अजूनही पटलेली नसून पुढील तपास सुरू आहे.
संदीप कांबळे कामठी