कॉंग्रेसचे दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्राचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन दि. ७ ऑक्टोबरला संपन्न झाले. कलश अपार्टमेंट, पांडे ले-आऊट, खामला रोड (पंजाब नॅशनल बँकेच्या समोर), नागपूर येथे हे प्रशस्त कार्यालय स्थापन करण्यात आले आहे.
सेवाग्राम आश्रमाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत श्री. मा. म. गडकरी काका, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी श्रीमती लीलाताई चितळे, श्री. प्रफुल्ल गुडधे पाटील व श्री. दिलीप पनकुले यांचे शुभ हस्ते कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
श्रीमती लीलाताई चितळे म्हणाल्या,”सध्याचे सरकार संविधानविरोधी कार्य करीत असल्यामुळे भारताची लोकशाही धोक्यात येऊ शकते. डॉ. आशिष देशमुख हे ही मोठी निवडणूक लढत असून त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. परिवर्तन तर होणारच…!!”