Advertisement
कामठी :-स्थानिक कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या हनुमान मंदिर रमानगर रेल्वे मार्गावर एका अज्ञात रेल्वेगाडीच्या धडकेने एका विवाहित तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी साडे नऊ वाजता निदर्शनास आले असून मृतक तरुणाचे नाव हिरालाल मगन तायडे वय 38 वर्षे रा रमानगर कामठी असे आहे.
घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलिसानी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह कामठी च्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदनगृहात हलविण्यात आले.
यासंदर्भात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.मृतकाच्या पाठीमागे पत्नी, आई व भाऊ असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.
संदीप कांबळे कामठी