नागपूर | मोस्ट वॉंन्टेड गुंड संतोष आंबेकरला नागपूर पोलिसांनी खंडणीप्रकरणी अटक केली आहे. यावेळी पोलिसांनी आंबेकरला नेसत्या कपड्यानिशी चौकशीसाठी पकडून नेले. यावेळी त्याला चप्पलही घालण्याची संधी दिली नाही. त्यामुळे पोलिसांनी आंबेकरची एकप्रकारे धिंड काढल्याचं बोललं जातंय.
खंडणी, दरोडा, खून, दंगल भडकवणे अशा अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये आंबेकरला यापूर्वीही अटक करण्यात आली होती. नागपूरच्या गुन्हेगारी वर्तुळात त्याची मोठी दहशत आहे. त्यामुळे पोलिसांनी आंबेकरची दहशत मोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे.
आंबेकरने एका गुजराती व्यापाऱ्याकडे जमीन खरेदीप्रकरणी एक कोटीची खंडणी मागितली होती. व्यापाऱ्याने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. नागपूर क्राईम ब्रँचने यासंबधी पुरावे गोळा केले होते. अखेर सापळा रचून पोलिसांनी त्याला अटक केली.
संतोष आंबेकरला मोक्का न्यायालयाने 10 वर्षाची शिक्षा सुनावणी होती. पण त्याची यातून तीन वेळा निर्दोष मुक्तता झाली आहे. खंडणी मागणे, प्राॅपर्टीसाठी धमकावणे, दरोडा यासाठी आंबेकर नागपूरमध्ये चर्चेत असतो.