दंडात्मक कारवाई करण्यासाठी तहसील कार्यालयात तीनही वाहन जमा
कामठी:-, विनापरवाना अवैधरित्या रेतीची चोरी तस्करी करून असलेला ट्रॅक्टर सह दोन ट्रक ओहरलोड रेतीची वाहतूक करताना कामठीचे तहसीलदार अरविंद हिंगे यांनी पकडून तहसील कार्यालयात दंडात्मक कार्यालयात कारवाई करण्यासाठी तीनही वाहन जमा करण्यात आले आहे दुसऱय दिवशीही रेती चोरी तस्करी ची कारवाई केल्यामुळे अवैध रेती तस्करी चोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत
कामठी चे तहसीलदार रवींद्र हीगे यांना सकाळी 7 वाजता सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कामठी तालुक्यातील सोनेगाव कन्हान नदी रेतीघाटा वरून विनापरवाना अवैधरित्या (सोनेगाव राजा )येथील राहुल रामकृष्ण नाकतोडे वय 27 ट्रॅक्टर क्रमांक एम एच 40 बीजी 16 39 मध्ये विनापरवाना रॉयल्टी ने एक ब्रास रेती भरून कामठी कडे जात असताना गुथाळा शिवारात ट्रॅक्टर थांबवून तहसीलदार हिंगे
यांनी चौकशी केली असता त्यांच्याकडे रती वाहतुकीचा कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्यामुळे ट्रॅक्टर तहसील कार्यालयात दंडात्मक कारवाई करन्यासाठी जमा करण्यात आला आहे दुसरी कारवाई नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील लिहिगाव पेट्रोल पंप जवळ जैयकिशन ठाकरे राहणार यकलारी तहसील मोदी जिल्हा भंडारा हा ट्रक क्रमांक MH 36 AA 1030 मध्ये समतेपेक्षा 3 ब्रास जास्त प्रमाणात रेती भरून दुसरा ट्रक चालक रोशन राऊत राहणार डॉगरला तहसील तुमसर जिल्हा भंडारा हा ट्रक क्रमांक MH 36 AA 1077
मध्ये क्षमतेपेक्षा 3 ब्रास रेती जास्त प्रमाणात भरून नागपूर कडे घेऊन जात असताना दोन्ही ट्रक ची तहसीलदार अरविंद हिंगे यांनी सकाळी 8 वाजता सुमारास तपासणी केली। असता दोन्ही ट्रक मध्ये क्षमते पेक्षा 3 ब्रास रेती जास्त मिळून आल्यामुळे दोन्ही ट्रकवर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48 नुसार कारवाई करिता तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहेतवरील कारवाई तहसीलदार अरविद हिंगे, अमोल पोल, शेख शरीफ, राम गोरले, दिनकर गोरले यांनी केली
कालही तहसीलदार अरविंद हिंगे यांनी रेती चोरीचा ट्रक पकडून कारवाई केली होती आज दुसऱ्या दिवशीही तहसीलदार हिंगे यांनी रेती चोरी तस्करीची कारवाई केल्यामुळे अवैधरीत्या रेती चोरी तस्करी करणाऱ्या चे धाबे दणाणले आहेत
संदीप कांबळे