कन्हान : – एकता शारदा उत्सव मंडल गोंडेगाव तर्फे नवरंग लावणी व खडी गम्मतीचा कार्यक्रम व गुणवंत खेडाळु व मान्यवरांच्या सत्कार सोहळ्यासह मंडई उत्सव थाटात साजरा करण्यात आला.
एकता शारदा उत्सव मंडल गोंडेगाव तर्फे शनिवार (दि.९) ला सायंकाळी ७ वाजता नवरंग लावणी च्या कार्यक्रमाने मंडई उत्सवाची सुरूवात करण्यात आली. रविवार (दि.१०) सकाळी ११ वाजता शाहीर केशव साथी शाहीर रविंद्र व संच च्या खडी गम्मतीच्या कार्यक्रमाने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
याच दरम्यान सत्कार सोहळ्यात नेपाल येथे झालेल्या कराटे स्पर्धेत प्रथम पारितोषि क प्राप्त करण्यारे गोंडेगाव च्या श्रेया रासेगावकर, समीर रासेगावकर, आरुष मेश्राम व मान्यवरांचा प्रहार संघटना नागपुर जिल्हा अध्यक्ष रमेश कारेमोरे, किशोर बेलसरे, सरपंच नितेश राऊत, उपसरपंच सुभाष डोकरीमारे आदीच्या हस्ते गौरव सत्कार करण्यात आला.
गोंडेगाव मंडई उत्सव कार्यक्रमाचा परिसरातील गावक-यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित होऊन मनसोक्त लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता सरपंच नितेश राउत, उपसरपंच सुभाष डोकरी मारे, यादव मुरकुटे, शंकर चौधरी, गणेश डोकरीमारे, कुणाल मधुमटके, तुषार मुरकुटे,धनराज कुंभलकर, विट्ठल ठाकुर, सुरेश पाटील, ईशांत वानखेड़े, आकाश कोडवते, सुनील धुरिया व सर्व एकता शारदा उत्सव मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकत्यांनी सहकार्य केले.