Published On : Mon, Nov 18th, 2019

संदीप जोशी, हर्षला साबळे, मोहम्मद इब्राहिम यांनी भरले महापौर पदासाठी नामांकन

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या नवीन महापौर व उपमहापौर निवडीसाठी नामांकन अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारी (ता.१८) पार पडली. महापौर व उपमहापौर पदासाठी भारतीय जनता पक्ष, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व बहुजन समाज पक्षाच्या नगरसेवकांनी नामांकन अर्ज सादर केले. भारतीय जनता पक्षाकडून विद्यमान सत्तापक्ष नेते तथा प्रभाग क्रमांक १६ड चे नगरसेवक संदीप जोशी यांनी नामांकन अर्ज सादर केले. तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रभाग क्रमांक १७ क च्या नगरसेविका हर्षला साबळे आणि बहुजन समाज पक्षाकडून प्रभाग क्रमांक ६ड चे नगरसेवक मोहम्मद इब्रहिम यांनी नामांकन अर्ज सादर केले.

उपमहापौर पदासाठी भारतीय जनता पक्षाकडून प्रभाग २६क च्या नगरसेविका मनिषा कोठे, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रभाग २३ड चे नगरसेवक दुनेश्वर पेठे, बहुजन समाज पक्षाकडून प्रभाग ७क च्या नगरसेविका मंगला लांजेवार यांनी नामांकन अर्ज सादर केले.

Gold Rate
21 April 2025
Gold 24 KT 96,700 /-
Gold 22 KT 89,900 /-
Silver / Kg 96,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सोमवारी (ता.१८) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये निगम सचिव हरीश दुबे यांनी सर्व उमेदवारांचे नामांकन अर्ज स्वीकारले.

भाजपचे महापौर पदाचे उमेदवार संदीप जोशी यांच्या नावाला विद्यमान महापौर नंदा जिचकार ह्या सूचक तर ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके अनुमोदक होते. तर उमहापौर पदाच्या उमेदवार मनिषा कोठे यांचे सूचक विद्यमान उपमहापौर दीपराज पार्डीकर व अनुमोदक स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे हे होते.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महापौर पदाच्या उमेदवार हर्षला साबळे यांचे सूचक विरोधी पक्षनेते तानाजी वनवे तर अनुमोदक ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे हे होते. उपमहापौर पदाचे उमेदवार दुनेश्वर पेठे यांचे सूचक नगरसेविका प्रणिता शहाणे व अनुमोदक ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे होते.

बहुजन समाज पक्षाचे महापौर पदाचे उमेदवार मोहम्मद इब्राहिम यांचे आसीनगर झोन सभापती विरंका भिवगडे या सूचक तर नगरसेवक संजय बुर्रेवार हे अनुमोदक होते. उपहापौर पदाच्या उमेदवार मंगला लांजेवार यांच्या सूचक बसपा गटनेत्या वैशाली नारनवरे व अनुमोदक नगरसेविका वंदना चांदेकर ह्या होत्या.

भाजपचे महापौरपदाचे उमेदवार संदीप जोशी आणि उपमहापौर पदाच्या उमेदवार मनिषा कोठे यांनी नामांकन अर्जाचे प्रत्येकी तीन संच सादर केले तर काँग्रेस-राकाँचे महापौरपदाचे उमेदवार हर्षला साबळे आणि उपमहापौरपदाचे उमेदवार दुनेश्वर पेठे यांनी प्रत्येकी दोन संच सादर केले.

भाजप उमेदवारांचे नामांकन अर्ज सादर करतेप्रसंगी महापौर नंदा जिचकार, ओ.बी.सी. विकास महामंडळाचे अध्यक्ष अविनाश ठाकरे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार गिरीश व्यास, उपमहापौर दीपराज पार्डीकर, माजी खासदार अजय संचेती, माजी आमदार सुधाकर कोहळे, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, स्थापत्य समिती सभापती अभय गोटेकर, जलप्रदाय समिती सभापती विजय झलके, परिवहन समिती सभापती जितेंद्र कुकडे, शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, विधी समिती सभापती धर्मपाल मेश्राम, शिक्षण समिती उपसभापती प्रमोद तभाने, आरोग्य समिती उपसभापती नागेश सहारे, प्रतोद दिव्या धुरडे, लकडगंज झोन सभापती राजकुमार साहु, गांधीबाग झोन सभापती वंदना येंगटवार, हनुमान नगर झोन सभापती माधुरी ठाकरे, भाजपाचे विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, नगरसेवक सर्वश्री सुनील अग्रवाल, डॉ.रवींद्र भोयर, किशोर वानखेडे, सुनील हिरणवार, हरीश दिकोंडवार, राजेंद्र सोनकुसरे, दिपक चौधरी, नागेश मानकर, लखन येरवार, संजय महाजन, महेंद्र धनविजय, नगरसेविका रूपा रॉय, प्रगती पाटील, स्नेहल बिहारे, मनिषा धावडे, रूपाली ठाकुर, विशाखा बांते, स्वाती आखतरकर, वंदना भगत, कांता रारोकर, चेतना टांक, निरंजना पाटील, रिता मुळे, भाग्यश्री कानतोडे, सुषमा चौधरी, अर्चना पाठक, प्रमिला मथराणी, सरला नायक, श्रद्धा पाठक, नसीम बानो इब्राहिम खान, भारती बुंडे, मंगला खेकरे, शिल्पा धोटे, लीला हाथीबेड, विद्या मडावी, सोनाली कडू, पल्लवी शामकुळे, मिनाक्षी तेलगोटे, रुतिका मसराम, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवाराचे अर्ज सादर करताना विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, नगरसेवक परसराम मानवटकर, किशोर जिचकार, नगरसेविका आशा उईके, तर बसपाकडून उमेदवाराचे अर्ज सादर करताना गटनेत्या वैशाली नारनवरे, आसीनगर झोन सभापती विरंका भिवगडे, नगरसेविका वंदना चांदेकर, संजय बुर्रेवार आदी उपस्थित होते.

शुक्रवारी होणार निवडणूक

शुक्रवारी २२ नोव्हेंबरला महाल येथील राजे रघुजी भोसले नगर भवन येथे निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाईल. शुक्रवारी सुरूवातील पिठासीन अधिका-यांद्वारे नामनिर्देशपत्राची छानणी केली जाईल.

यानंतर उमेदवारांना नामनिर्देशनपत्र मागे घेण्यास वेळ दिला जाईल. पिठासीन अधिका-यांद्वारे उमेदवारांची नावे घोषित झाल्यानंतर आवश्यक असल्यास मतदान घेण्यात येईल. यानंतर पिठासीन अधिकारी नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांच्या नावाची घोषणा करतील.

Advertisement
Advertisement