नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने व्यवसाय प्रशासन आणि व्यवसाय व्यवस्थापन या शाखेअंतर्गत सादर केलेल्या शोधप्रबंधाकरिता श्रीमती नेहा अविनाश आचार्य यांना पीएचडी पदवी बहाल केली आहे.
‘नागपूर जिल्ह्यातील कर्मचार्यांच्या नोकरीतील समाधानाचे महत्वपूर्ण मूल्यांकन (माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या विशेष संदर्भात) (Critical evaluation of Job satisfaction of employees in Nagpur District (with special reference to IT sector)) या विषयावरील त्यांच्या या शोधप्रबंधासाठी ही पदवी बहाल करण्यात आली असून सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. बी. के. देशपांडे यांच्या मार्गदर्शनात त्यांनी हा शोधप्रबंध पुर्ण केला आहे.
नेहा अविनाश आचार्य या सिटी प्रिमियर व्यवस्थापन महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य करतात. त्यांच्या यशाबद्दल सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.