साई इंटरनॅशनल स्कूलचा स्तुत्य उपक्रम
रामटेक :- येथील साई इंटरनॅशनल स्कूल मध्ये नुकतेच शाळेतील विध्यार्थ्यांना योगा आणि प्राणायाम चे धडे शिकवण्यात आले . ज्याप्रकारे विध्यार्थ्यांना शैक्षणिक गोष्टीची गरज आहे त्याच प्रकारे त्यांच्या आणि सर्वांनच्या दैनिक आणि धकाधकीच्या जीवनात योग आणि प्राणायामाची गरज आहे. योग आणि प्राणायाममुळे मन प्रसन्न तर होतेच त्याचप्रकारे शरीर पण सुदृढ आणि आजारमुक्त होते.
शाळेच्या पटांगणात सकाळी योग आणि प्राणायमाचे महत्व शाळेच्या इन्चार्ज संगीता वैद्य मॅडम यांनी समझवून दिले . ह्यावेळी शाळेतील शिक्षक व काही विध्यार्थानी योग आणि प्राणायाम सर्व विध्यार्थ्यां समोर करून दाखविले त्यात वंशिका वाडीभस्मे, सांची काठोके, लक्ष बिसेन, नव्या जिवतोडे यांचा समावेश होता.
प्राणायमा मध्ये – भस्त्रिका, कपालभाती, बाह्य प्राणायाम, अनुलोम विलोम, भ्रामरी आणि योग मध्ये -पद्मासन, शिशुआसन, जणू शीर आसन, पश्चिमोत्तानासन, पुर्वोत्तनासन, बद्धकोणासन, चक्की चलाना आसन, वक्रासन, भुजंगासन, धनुरासन, यांचा समावेश होता….
यात शाळेचे मुख्याध्यापक महेश नांदेकर तसेच शाळेच्या इन्चार्ज संगीता वैद्य यांनी सुद्धा योग आणि प्राणायामाचे महत्व विध्यार्थ्यांना समझवून सांगितले आणि नेहाल बिसमोगरे स्पोर्ट टीचर यांनी प्राणायम आणि योग चे मार्गदर्शन तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंदांचा यात समावेश होता.