Published On : Wed, Dec 4th, 2019

घोडे, तोफा आणि आतषबाजीही थोर राणीची भावविभोर कहाणी

Advertisement

विवाहाच्या वेळी झालेली फटाक्यांची आतषबाजी, रणभूमीवर पाठीला मूल बांधून घोड्यावर युद्धासाठी सज्ज झालेली महाराणी लक्ष्मीबाई आणि तोफांच्या गर्जनानी ईश्वर देशमुख महाविद्यालयाचा परिसर दुमदुमून गेला. थोर राणी लक्ष्मीबाईंची भावविभोर करणारी कहाणी मंगळवारी नागपूरकरांनी अनुभवली.
राणी लक्ष्‍मीबाईवरील पहिले महानाट्य ‘झांशी की राणी – रणरागिणी’ खासदार सांस्कृतिक  महोत्‍सवाच्या चोथ्या दिवशी सादर करण्यात आले.

सहाय्य फाउंडेशन प्रस्तुत ‘झांशी की राणी – रणरागिणी’ हे झांशीची राणी लक्ष्मीबाई यांचा जीवनपट उलगडणारे हिंदी महानाट्य स्वातंत्र्याच्या  लढ्यात आपल्या प्राणांची आहूती देणा-या रणरागिणी झांशीची राणी लक्ष्‍मीबाई यांच्‍या जीवनावर आधारित होते.

Gold Rate
22 April 2025
Gold 24 KT 99,400 /-
Gold 22 KT 92,400 /-
Silver / Kg 97,000 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मोरोपंत तांबे यांची मुलगी मनकर्णिका म्हणजेच मनुचेबालपण, त्यावेळचे तिचे धाडस, तिचे साहसी विचार, निर्णय क्षमता विविध प्रसंगद्वारे प्रस्तुत करण्यात आली.

‘एक हत्तीच काय असे अनेक हत्ती माझ्या राज्यात राहतील, मी राणी होईल’असे ती म्हणते . मराठी, हिंदी, संस्कृती, शास्त्र, शास्त्र विद्या अशा विविध प्रकारच्या निपुण असलेल्या मनुचा विवाह योजिले जातो.

राजयोग असलेल्या मनूच्या भाग्यात झाशीची राणी होणे लिहिलेले असते.1857 च्या उठावातील तिचे शोर्य नाटकाचे कळस बिंदू ठरले. मेरी झाशी नही दुनगी अशी गर्जना होताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

या नाटकाचे मुख्य सूत्रधार प्रसिद्ध बालनाट्य निर्माते संजय पेंडसे होते तर निर्मिती इंद्रनील कायरकर यांची होती. लेखन गौरव खोंड यांनी केले होते. दिग्दर्शन नचिकेत म्हैसाळकर यांनी केले होते. 

राणी लक्ष्‍मीबाईची भूमिका राधिका पेंडसे – देशपांडे यांनी केली तर गंगाधररावांच्या भूमिकेत विपुल साळुंके होते. बाजीराव पेशव्यांची भूमिका देवेंद्र दोडके तर लक्ष्मीबाईचे वडील मोरोपंत यांची भूमिका प्रसिद्ध अभिनेते अरुण नलावडे यांनी केली. मुख्‍य शाहिराच्या भूमिकेत अभिनेते सुशांत शेलार यांनी वठवली. 

खासदार सांस्कृतिक महोत्सवात मंगळवारी मनपा आयुक्त अभिजित बांगर, ज्येष्ठ पत्रकार शैलेश पांडे, व मनिकांत सोनी, प्रा. अनिल सोले, जयप्रकाश गुप्ता, राजेश बागडी, महापौर संदीप जोशी, उपमहापौर मनीषा कोठे, श्रीकांत देशपांडे, संजय ठाकरे, प्रविण दटके, बंटी कुकडे, आमदार नागो गाणार यांची उपस्थिती होती. 

आजही आहे प्रयोग
राणी लक्ष्‍मीबाईवरील ‘झांशी की राणी – रणरागिणी या हिंदी महानाट्याचा प्रयोग आज बुधवारी 4 डिसेंबर ईश्वर देशमुख महाविद्यालयाच्या पटांगणात सायंकाळी 6 वाजता होईल.

Advertisement
Advertisement