नागपूर : कपिल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका १९ वर्षीय मुलीने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून तिचे कुटुंबीय आणि मित्रमंडळींना मोठा धक्का बसला आहे.
स्नेहा पंकज शर्मा (१९, रा. म्हाडा कॉलनी, कडू लेआउट) असे या तरुणीचे नाव आहे. तिने नुकतीच तिची १२वीची परीक्षा दिली होती आणि ती संगणक प्रशिक्षण घेत होती. तिचे वडील पंकज हे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे.
कपिल नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी स्नेहा सकाळी साडेसातच्या सुमारास कॉम्प्युटर क्लाससाठी घरातून निघाली. मात्र, तिने क्लास अर्ध्यातच सोडला. त्यानंतर ती तिच्या घराजवळील अपार्टमेंट इमारतीच्या चौथ्या मजल्यावर गेली आणि तिने उडी मारली. घटनेची माहिती मिळताच तिच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तिला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. दुपारी बाराच्या सुमारास डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अद्याप कोणतीही सुसाइड नोट सापडली नसल्याचेही पोलिसांनी सांगितले.
मात्र, स्नेहा काही तणावात किंवा नैराश्यात आली असावी, ज्यामुळे तिने एवढं टोकाचं पाऊल उचललं असावं, असा अंदाज वर्तवला जात आहे. कुटुंबीयांच्या जवळच्या सूत्रांनी पोलिसांना खुलासा केला आहे की स्नेहा तिच्या मोबाईलवर बराच वेळ घालवत होती, त्यामुळे तिचे आई -वडिल तिला नेहमी रागवायचे. कपिलनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. स्नेहाच्या आत्महत्येमागील कारणाबाबत काही संकेत मिळू शकतो का हे पाहण्यासाठी ते स्नेहाच्या मोबाईलचीही चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे.