नागपूर: शहरातील लकडगंज पोलीस स्टेशनअंतर्गतमधून धक्कादायक घटना समोर आली आहे.
गुरुवारी, २७ मार्च रोजी, १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला त्रास देणे, तिच्या घरावर दगडफेक करणे आणि तिच्या वडिलांना मारहाण करणे या आरोपाखाली १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लकडगंज येथील रहिवासी तन्मय देवराव धकाते असे आरोपीचे नाव आहे. नेहमीप्रणे अल्पवयीन मुलगी शाळेत जात असताना आरोपीने तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केली.
जेव्हा पीडितेने त्याच्याकडे दुर्लक्ष केले .तेव्हा आरोपी तिच्या घरी गेला, दारावर दगडफेक केली आणि गोंधळ निर्माण केला. पीडितेच्या पालकांनी हस्तक्षेप केल्यानंतर, आरोपीने त्यांना शिवीगाळ केली आणि तिच्या वडिलांवर हल्ला केला.तसेच आणखी नुकसान करण्याची धमकी दिली.
पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीनंतर, लकडगंज पोलिसांनी बाल लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (POCSO) कायद्याच्या संबंधित तरतुदींसह BNS च्या कलम 78, 125, 115(2), आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.