Advertisement
नागपूर: वाडी परिसरातील पापुलर सोसायटीजवळ एका २२ वर्षीय तरुणीने स्वतः पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रियंका बांगरे असे मृत महिलेचे नाव असून नुकतेच तिचे साक्षगंध झाले होते. कौटुंबिक वादातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांकाचे नुकतेच साक्षगंध पार पडले. काही महिन्यांत तिचे लग्न होणार होते. मात्र, कौटुंबिक वादातून तिने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केल्याची माहिती आहे. पोलिस या प्रकरणाशी संबंधित इतर संभाव्य घटकांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.