नागपूर : शहरातील गणेश पेठ मॉडेल मिल चाळीजवळ भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात 6 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. आराध्या धीरज नागदिवे (रा. पंजाब जालंधर) असे मृत मुलीचे नाव आहे.
माहितीनुसार,नागपूरच्या मॉडेल मिल चाळी समोर आज गुरूवारी दुपारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. बसच्या चाकाखाली येऊन एका सहा वर्षीय मुलीचा करूण अंत झाला आहे. आराध्या धीरज नागदिवे असं या चिमुरडीचं नाव आहे.
या चिमुरडीचे कुटुंब पंजाब येथील आहे. तिचे नातेवाईक नागपूरात राहतात. मॉडेल मिल चाळीत तिचा मामा राहतो. त्याच्या लग्नाला ही चिमुरडी नागपूरात आली होती.
घरातले सर्व जण लग्नाच्या गडबडीत होते. त्यावेळी आराध्याही घराच्या बाहेर खेळत होती. त्या वेळी खेळता खेळता ती धावत रस्त्यावर आली. त्यावेळी समोरू आलेल्या बसने (MH 31 एफ सी 0425) तिला उडवले. त्यात तिचा दुर्दैवी अंत झाला. बस चालक सुरेश पारधी याला गणेशपेठ पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.