नागपूर : भिवापूर गावातील पेट्रोल पंपाजवळ बुधवारी उमरेड पोलिसांनी एका 60 वर्षीय नागपुरातील वृद्धाची हत्या केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तुकाराम काळसर्पे असे मृताचे नाव आहे.
नागपूर टुडेशी बोलताना पोलीस अधीक्षक (एसपी) विशाल आनंद यांनी हत्येच्या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र काळसर्पे यांची हत्या नेमक्या कोणत्या कारणामुळे झाली आणि कोणी केली यासंदर्भात पोलिसांकडून तपास सुरु आहे. आरोपीने काळसर्पे यांचा स्कार्फने गळा आवळून हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
उमरेड पोलीस स्टेशन अंतर्गत भिवापूर गावातील पेट्रोल पंपाजवळ एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. उमरेड पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कालसर्पे यांची अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याचा आरोप आहे, जो अनेकदा मृतकासोबत दिसत होता. कालसर्पे यांना खापरी गावातील त्यांच्याच शेतात अज्ञात व्यक्तीसोबत वारंवार पाहिले जात होते. काळसर्पे यांना याच व्यक्तीसोबत शेवटचे पहिले गेले होते.
दरम्यान या हत्येच्या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी नागपूर ग्रामीण पोलिसांनी पथके तयार केली असून आरोपीचा शोध सुरु केला आहे.