Published On : Tue, Dec 5th, 2023

नागपुरात आजारपणाला कंटाळून ७० वर्षीय पतीने पत्नीला संपवून केली आत्महत्या !

Advertisement

नागपूर : वृद्धाअवस्थेतआजारपणाला कंटाळून ७० वर्षीय पतीने पत्नीला संपवून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना मौदा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माथनी येथे घडली. प्रभाकर रामाजी गजभिये (वय ७५) व त्यांच्या पत्नी विमला गजभिये (वय ७०) अशी मृतकांची नावे आहेत.

माहितीनुसार, विमला या गेल्या तीन महिन्यांपासून आजारी होत्या. अंथरुणावरच खिळून होत्या तर . प्रभाकर यांना दम्याचा आजार होता.सततच्या आजारपणाला कंटाळून रविवारी सायंकाळी त्यांनी दुपट्ट्याने गळा आवळून विमला यांची हत्या केली. त्यानंतर दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Advertisement

आत्महत्या करण्यापूर्वी प्रभाकर यांनी चिठ्ठी लिहिली होती.

या चिठ्ठीत मी व पत्नी सतत आजारी राहतो. या आजाराला मी कंटाळलो असून पत्नीची हत्या करून आत्महत्या करीत आहे, असे त्यांनी नमूद केले.प्रभाकर आणि विमला यांना मुलगा व मुलगी असून मागील वर्षी ते दोघेही माथनी येथे मुलीकडे राहायला आले होते. त्यांचा मुलगा छत्तीसगडमध्ये नोकरी करीत असल्याची माहिती आहे. याप्रकरणी मौदा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.