नागपूर :लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. निवडणुकीच्या या हंगामात जनतेला मोठा झटका बसला आहे. महावितरणने 1 एप्रिल 2024 पासून विजेच्या दरात 10 ते 20 टक्के वाढ केली आहे. एकीकडे जनता आधीच महागाईने हैराण झाली आहे, तर दुसरीकडे वीज कंपन्यांच्या या निर्णयाने मोठा धक्का बसला.
महावितरणने जारी केलेल्या नवीन दर आराखड्यांतर्गत 0 ते 100 युनिटसाठी नागरिकांना 5.58 रुपये प्रति युनिट मोजावे लागत होते, आता त्यांना 5.88 रुपये प्रति युनिट मोजावे लागणार आहेत.
म्हणजेच आता ग्राहकांना प्रति युनिट 30 पैसे अधिक मोजावे लागणार आहेत. तर 101 ते 300 युनिटसाठी 11 रुपये 46 पैसे, 301 ते 500 युनिटवर 15 रुपये 72 पैसे आणि 500 युनिट्सवर 17 रुपये 81 पैसे मोजावे लागणार आहेत. त्याचबरोबर व्यावसायिक दरातही वाढ करण्यात आली आहे.
नवीन दरानुसार, व्यावसायिक ग्राहकांना 0 ते 20 किलोवॅटसाठी रुपये 9.69 पैसे, 20 ते 50 किलोवॅटसाठी रुपये 14.18 पैसे आणि 50 किलोवॅटपेक्षा अधिकसाठी 16.55 पैसे मोजावे लागतील.