नागपूर : समृद्धी महामार्गावर दिवसेंदिवस अपघाताच्या संख्येत वाढ होत चालली आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला. महामार्गावर लवकरच एअर ऍम्ब्युलन्स सेवा सुरु करण्यात येणार आहे. याकरिता सरकारची हेलिकॉप्टर कंपन्यांशी चर्चा सुरु आहे. इतकेच नाही तर नागपूर ते मुंबई दरम्यानच्या खाजगी तसंच महत्त्वाच्या हॉस्पिटलसोबत राज्य सरकार करार करणार आहे. अपघात झाल्यास तात्काळ वैद्यकीय सेवा मिळणे हा यामागचा हेतू आहे.
राज्य सरकारकडून तब्बल साडेपाच हजार कोटी रुपये खर्च करुन समृद्धी महामार्गाची निर्मिती करण्यात आली. नागपूर ते मुंबई असा 701 किलोमीटरचा महामार्ग आहे.
मागील वर्षी डिसेंबरमध्ये म्हणजेच सात महिन्यांपूर्वी समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. या सात महिन्यांच्या कालावधीत 1000 अपघात झाले आहेत. त्यात 100 पेक्षा अधिक प्रवाशांचा बळी गेला आहे.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये म्हणजेच सात महिन्यांपूर्वी समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. या सात महिन्यांच्या कालावधीत 1000 अपघात झाले आहेत. त्यात 100 पेक्षा अधिक प्रवाशांचा बळी गेला आहे. समृद्धी महामार्गावर नुकत्याच सिंदखेडराजाजवळ झालेल्या भीषण अपघातात 26 जणांचा बळी गेला. बस उलटल्यानंतर लागलेल्या आगीत प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.