Published On : Wed, Mar 7th, 2018

कत्तलखान्यात गाई घेऊन जाणारी बोलोरो जीप उलटली


नागपूर: स्थानिक पोलीस स्टेशन हद्दीतील दहेगाव (रंगारी) शिवारात नागपूर – सावनेर महामार्ग 69वर रिलायन्स पेट्रोल पंप जवळ मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास कत्तलखान्यात एकुण नऊ गाई वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाचे अचानक संतुलन बिघडल्याने बोलोरो महिन्द्रा जीप उलटल्याची घटना घडली. सदर घटनेत एकुण 9 गाई होत्या यापैकी सर्वच गायी किरकोळ जखमी झाल्या असून त्यांची गौरक्षण सभेत रवानगी करण्यात आली आहे.

राज्यात गौ मांसावर बंदी असतांना मागील अनेक वर्षांपासून नागपूर जिल्ह्यातील कत्तलखान्यात चोरट्यां मार्गाने गाईची वाहतूक सुरू आहे. यात अनेक घटना घडलेल्या आहेत. मात्र यावर आळा बसण्या ऐवजी गाईंच्या तस्करीचा व्यवसाय बिनधास्तपणे सुरू असून 7 फेब्रुवारी मंगळवारला छिदंवाडा मध्यप्रदेशातून बोलेरो जीप क्र.MH-31-CQ-7500 या चारचाकी वाहनातून 9 गाईंना कोंबून नागपूर परिसरातील कत्तलखान्यात गायीची वाहतूक करीत असतांना पहाटेच्या सुमारास अज्ञात वाहन चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने बोलेरो जीपने पलटी मारली.

यात 9 गाई जखमी झाल्या असून गायी हंबरडत होत्या. मार्गावरील येजा करणाऱ्या नी व दहेगाव (रं) गावातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. बघ्यांनी सदर घटनेची माहिती खापरखेडा पोलिसांना दिली लागलीच माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले व पंचनामा करून सदर गाईंना गौरक्षण सभेत सुरक्षितपणे हलविण्यात आले. यादरम्यान मात्र घटनास्थळावरून आरोपी वाहनचालक पसार झाला होता. बातमी लिहोस्तर आरोपी ला अटक झालेली नव्हती. सदर घटने प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी गुन्ह्याची नोद केली असून साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सूर्यभान जळते,अर्पित पशीने, कनोजिया पुढील तपास करीत आहे.

Gold Rate
Saturday08 Feb. 2025
Gold 24 KT 85,100 /-
Gold 22 KT 79,100 /-
Silver / Kg 95,800 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

Advertisement