Published On : Thu, Jul 4th, 2024
By Nagpur Today Nagpur News

प्रसिद्ध स्पोर्ट्स अँकर रिद्धिमा पाठक हिच्यावर नागपुरात गुन्हा दाखल

Advertisement

नागपूर : प्रसिद्ध स्पोर्ट्स अँकर रिद्धिमा पाठक आणि तिचा भाऊ इशांत पाठक यांच्याविरुद्ध नागपूरच्या सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रिद्धिमा पाठकने आयपीएल, आयसीसी वर्ल्ड कपमध्ये अँकरिंग केले. तसेच ती एक मॉडेलही आहे. तिचा भाऊ इशांत, दोघेही पुण्यातील रिस्विच टेक्नॉलॉजी नावाच्या कंपनीचे मालक आहेत, त्यांची कंपनी ऑस्ट्रेलियाच्या एस्टिमेट इलेक्ट्रिक कंपनीला वीज पुरवते.

या कंपनीला इलेक्ट्रिशियनच्या कामाचे अंदाजपत्रक बनवण्याचे काम मिळाले होते, या कंपनीला इलेक्ट्रिशियनचे बिल बनवण्यासाठी सॉफ्टवेअर बनवण्याचे काम मिळाले होते, परंतु रिद्धिमा आणि तिचा भाऊ इशांत यांनी बोगस आणि जास्त बिले या विदेशी कंपनीला पाठविले. यामुळे परदेशी कंपनीने रिद्धिमाच्या कंपनीसोबतचा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर रिद्धिमाने तिच्या भावासह कंपनीचे पेमेंट गेटवे हॅक केल्यामुळे कंपनीचे सुमारे 15 हजार AUD चे आर्थिक नुकसान झाले.

Gold Rate
03 April 2025
Gold 24 KT 91,900 /-
Gold 22 KT 85,500 /-
Silver / Kg 98,900 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ऑस्ट्रेलियन कंपनीचे नागपुरात कार्यालय असल्याने सदर कर्मचाऱ्याने नागपूरच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडित ऑस्ट्रेलियन कंपनीचे वकील इशांत तंबी यांनी सांगितले की, आम्ही न्यायालयात धाव घेतली . मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानंतर मॉडेल आणि स्पोर्ट्स अँकर रिद्धिमा पाठक, तिचा भाऊ इशांत यांच्याविरुद्ध आयपीसी कलम 406,420,467 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणाची आयपीसी 66 मध्ये नोंदणी केली आहे.

Advertisement
Advertisement